"कंत्राटी कामगारांच्या शोषणाला महापालिका जबाबदार"
By गणेश हुड | Updated: February 15, 2024 21:35 IST2024-02-15T21:34:53+5:302024-02-15T21:35:24+5:30
कामगार नेत्यांचा आरोप : मनपा कंत्राटदार कामगार परिषद

"कंत्राटी कामगारांच्या शोषणाला महापालिका जबाबदार"
नागपूर : मुंबई, नागपूरसह राज्य भरातील महापालिकात आज हजारो कंत्राटी कामगारांकडून नागरी सेवा पुरविल्या जात आहेत. परंतु कंत्राटी कामगारांचे शोषण सुरू आहे. याला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप कामगार संघटनांच्या नेत्यांनी नागपूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या कंत्राटदार कामगारांच्या परिषदेत केला.
कचरा वाहतूक संघटना मुंबईचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी शासनाच्या कामगार विरोधी धोरणावर हल्लाबोल केला.
मुंबईतील २५ वर्षांच्या अथक संघर्षामुळे सुमारे चार हजार कामगारांना कायम करण्यात युनियनला यश आले आहे. नागपुरातील कामगारांनही संघटीत व्हावे, असे आवाहन केले. परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते भाई जम्मू आनंद म्हणाले, नागपूर महापालिका ही देशातील एकमेव अशी महापालिका आहे की, या मनपाने आपल्या सर्व नागरी सेवा व प्रशासकीय कामांचे खाजगीकरण केले आहे. यावेळी संघटनेचे सचिव रमेश गवई, शिवा बावणे, अर्चना मंगरुळकर आदींनी मार्गदर्शन केले.