प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात कत्तलखाने, मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे पालिकेचे आदेश
By मंगेश व्यवहारे | Updated: January 24, 2024 15:48 IST2024-01-24T15:48:15+5:302024-01-24T15:48:26+5:30
शहरातील कत्तलखाने बंद राहणार, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात कत्तलखाने, मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे पालिकेचे आदेश
मंगेश व्यवहारे, नागपूर: भारतीय ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त’ २६ जानेवारी रोजी नागपूर शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश नागपूर महानगरपालिकेद्वारे जारी करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिशानिर्देशाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी यासंबंधी आदेश निर्गमित केले आहेत.
शुक्रवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शहरात कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावर नागपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.