शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मनपा आयुक्त मुंढेंना सीईओ पदावरून हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:58 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल) च्या मुख्य अधिकारी (सीईओ) पदावरून हटविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर झाला. त्याच बरोबर सीईओचा प्रभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देसंचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्ततुकाराम मुंढे यांना नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. (एनएसएससीडीसीएल) च्या मुख्य अधिकारी (सीईओ) पदावरून हटविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर झाला. त्याच बरोबर सीईओचा प्रभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत महापौर संदीप जोशी यांनी मागणी केली की सीईओ, संचालक नसतानाही गेल्या तीन महिन्यात मुंढे यांनी जे निर्णय घेतले, ते वैध आहेत किंवा नाही यावर केंद्र अथवा राज्य सरकारच्या अ‍ॅडव्होकेट जनरलचा कायदेशीर सल्ला घेण्यात यावा. संचालक मंडळाच्या पुढच्या बैठकीत त्या आधारावर निर्णय घ्यावा.बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना महापौर संदीप जोशी यांनी सांगितले की, प्रवीण परदेशी यांनी जे पत्र आयुक्त मुंढे यांना पाठविले होते, त्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता की, संचालक मंडळाच्या बैठकीत रामनाथ सोनवणे यांचा राजीनामा ठेवावा. त्यानंतर बोर्डाच्या परवानगीने सीईओचा चार्ज घ्यावा. परंतु मुंढे यांनी असे केले नाही, ते आज समोर आले.मनपा मुख्यालयातील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली. स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेशी व केंद्राचे अवर सचिव (फायनान्स) दीपक कोचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले. बैठकीत स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून महापौर संदीप जोशी, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, स्थायी समिती अध्यक्ष पिंडू झलके, बसपाचे गटनेता वैशाली नारनवरे, शिवसेनेच्या मंगला गवरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह निमंत्रित संचालक उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त मुंढे बैठकीत स्वत:ची नियुक्ती योग्य असल्याचे वारंवार सांगत होते तर काही संचालकांनी ते सीईओ असल्यावर आक्षेप घेतले. बैठकीत चेअरमन परदेशी यांनी व्होटिंगच्या आधारावर सीईओंची निवड करावी, असे मत व्यक्त केले. शिवसेनेच्या मंगला गवरे सोडल्यास बहुतांश संचालकांनी पूर्णवेळ सीईओची गरज व्यक्त करीत, सध्या सीईओंचा प्रभार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोपवून, नवीन सीईओंच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करावी, असे मत व्यक्त केले.

 सीईओंच्या निवडीसाठी व्होटिंग, शिवसेना मुंढे यांच्यासोबतसंचालक पिंटू झलके म्हणाले बैठकीत प्रवीण परदेशी यांनी सीईओंच्या निवडीसाठी व्होटिंग करावे, असे सांगितले. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी स्वत:ला सीईओ बनविण्यात यावे, असे बैठकीत सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नियमानुसार पूर्णवेळ सीईओ रहावा, असे मत व्यक्त केले. सध्यापुरता उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सीईओंचा चार्ज देऊन, नवीन सीईओंच्या नियुक्तीसाठी जाहिरात देण्यात यावी. याचे समर्थन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नासुप्र सभापती शीतल उगले यांनी केले. महापौर, सत्तापक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष विरोधी पक्ष नेते, बसपाचे गटनेता वैशाली नारनवरे व काही संचालकांनी मोरोणे यांना प्रभार द्यावा, या बाजूने व्होटिंग केले. दीपक कोचर यांनी सुद्धा पूर्णवेळ सीईओ असावा, असे मत व्यक्त करीत, मोरोणे यांच्याकडे प्रभार देण्यात यावा या बाजूने कौल दिला. यावेळी मंगला गवरे यांनी मुंढे यांचे समर्थन केले, त्या म्हणाल्या की जो काही निर्णय घ्याल, तो नियमानुसार घ्यावा. बैठकीत सीईओंच्या शैक्षणिक अर्हतेबाबतही चर्चा झाली.

 चेअरमनच्या आदेशानुसारच सीईओचा पदभार सांभाळला - मुंढेआयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, चेअरमनच्या आदेशानुसारच सीईओ बनलो. तीन महिन्याच्या कार्यकाळात जे काही निर्णय घेतले, त्याबाबत त्यांना अवगतही केले. कचरा ट्रान्सफर स्टेशनच्या जागी बायोमायनिंगला निधी देण्याबाबतही त्यांना अवगत केले होते. प्रत्येक निर्णय नियमानुसारच घेतले. ज्या बिलावर आपत्ती घेण्यात आली, त्याला चेअरमन यांनी योग्य ठरविले होते. कुठल्याही बाबतीत मी चूक केली नाही.

 मौखिक आदेशावर कोणी सीईओ बनतो का? - जोशीगेल्या २० दिवसापासून सत्तापक्ष जे सांगत आहे, ते आज खरे ठरले. चेअरमन प्रवीण परदेशी यांनी मुंढे यांना पदभार सांभाळण्यास सांगितले नव्हते. मौखिक आदेशाच्या आधारे कुणी सीईओ बनू शकत नाही. या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. तीन महिन्यात घेतलेल्या निर्णयावर कायद्याचा सल्ला घेण्याचे निर्देश दिले आहे. त्याच आधारे पुढचे पाऊल उचलण्यात येईल.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे माजी सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांचा राजीनामा संचालक मंडळाने स्वीकारला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना स्मार्ट सिटीचे डायरेक्टर नियुक्त केले.बैठकीत मुंढे यांच्या विरुद्ध काही संचालकांनी आवाज उचलला. संचालकांनी आक्षेप घेतला की, तुकाराम मुंढे गेल्या तीन महिन्यापासून स्वत:ला संचालक म्हणून सांगत आहे तर बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये त्यांना संचालक बनविण्याचा प्रस्ताव का नाही आला. स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिवाला नियम वाचून दाखविण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की, कायद्यानुसार बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या परवानगीनंतरच कुणी संचालक बनू शकतो. सीईओ पूर्णवेळ चार्जमध्ये असायला हवे.

मुंढे यांनी आता समन्वयाने वागावे : दटकेमनपा आयुक्त तुकाराम मुंढे सीईओ नाहीत, ते खोटे बोलत आहेत हे आम्ही वारंवार सांगत होतो. ते आज स्पष्ट झाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका अधिकाऱ्याची पाठराखण न करता, नियमांची संगत केली. गैरसरकारी दोन संचालकांनीदेखील कायद्याचीच बाजू घेतली. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मुंढे यांनी या पुढे संयमाने आणि समन्वयाने वागावे, असे मत भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थेचा गाडा हा लोकनियुक्त सदस्यांच्या सोबतीने हाकावा लागतो हे मुंढे यांनी समजून घ्यावे. आम्ही कुठल्या अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आहोत. शहराच्या विकासासाठी त्यांनी कामाची पद्धत बदलावी, असे दटके म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcommissionerआयुक्तNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका