शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 06:31 IST

भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा प्रस्ताव मांडला होता. चर्चेदरम्यान मुनगंटीवार म्हणाले,  राज्यातील सौंदर्यप्रसाधन व खाद्यविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या लाखांमध्ये आहे. 

नागपूर :  पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात पाकिस्तानातून आलेले सौंदर्यप्रसाधन जप्त करण्याच्या मुद्द्यावर  शुक्रवारी विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. चर्चेदरम्यान भाजप आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांची चांगलीच कोंडी केली. पाकिस्तानातून सौंदर्यप्रसाधने येत आहेत आणि राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग कर्मचाऱ्यांअभावी हलाखीचा सामना करतोय, वरचा ‘हरी’ वाचवेल का ठाऊक नाही, पण सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा आहे, असे म्हणत मुनगंटीवारांनी झिरवळ यांना चिमटे काढले.

    भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा प्रस्ताव मांडला होता. चर्चेदरम्यान मुनगंटीवार म्हणाले,  राज्यातील सौंदर्यप्रसाधन व खाद्यविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या लाखांमध्ये आहे.  मात्र, विभागाकडे तपासणी करण्याइतके मनुष्यबळच नाही. विभागाने पूरक मागणीत २०० कोटी मागितले होते; परंतु फक्त ३५ कोटींचेच बजेट देण्यात आल्याची टीका त्यांनी केली. यावर निवेदन करताना मंत्री झिरवळ यांनी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे मान्य केले. राज्यात मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेच प्रयोगशाळा असून आणखी दोन ठिकाणी लॅब उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निकषांनुसार विभागाला ७०० कर्मचाऱ्यांची गरज असून सध्या केवळ २०० पदांचीच मंजुरी आहे, त्यापैकीही अनेक पदे रिक्त आहेत.  एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया सुरू असून मार्चपर्यंत विभागाला आवश्यक तेवढे अन्न व औषध निरीक्षक आणि इतर कर्मचारी उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुमारे दीड लाख दुकाने सौंदर्य प्रसाधनांची विक्री करतात. मात्र, उत्पादन करणाऱ्या कंपनीला परवान्याची आवश्यकता असते, विक्रीसाठी परवाना बंधनकारक नाही. त्यामुळे या दुकानांना परवान्याच्या कक्षेत आणता येईल का, याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी सर्व दुकाने शोधून काढण्यास मोठा कालावधी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

विशेष तपास पथकाद्वारे चौकशी

पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने जप्त केल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे सोपवले गेले. मात्र, चौकशीची गती समाधानकारक नसल्याचे दिसते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिसांची विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री नरहळी झिरवळ यांनी आश्वस्त केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Munugantiwar corners Zirwal over Pakistani cosmetics; hopes for departmental relief.

Web Summary : Sudhir Mungantiwar grilled Minister Zirwal about Pakistani cosmetics entering Maharashtra due to staff shortages in the Food and Drug Administration. Zirwal acknowledged the shortages and promised recruitment, also mentioning plans for SIT investigation into the matter and a review of cosmetic sale regulations.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार