मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोटातील बंदिवानाला पॅरोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 01:19 AM2020-09-03T01:19:06+5:302020-09-03T01:22:17+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणातील बंदिवान मो. इकबाल मो. हनीफ शेख याला विविध अटींसह आपत्कालीन अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली.

Mumbai Railway Bomb Blast Prisoner Parole | मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोटातील बंदिवानाला पॅरोल

मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोटातील बंदिवानाला पॅरोल

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोट प्रकरणातील बंदिवान मो. इकबाल मो. हनीफ शेख याला विविध अटींसह आपत्कालीन अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली.
मो. इकबालला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याला अमरावती कारागृहात ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारद्वारे ८ मे रोजी जारी अधिसूचनेनुसार कोरोना संक्रमणामुळे ही रजा मिळण्यासाठी त्याने आधी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. २१ मे रोजी तो अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी त्याला चारदा संचित रजा मंजूर झाली होती. दरम्यान, तो तीनदा वेळेवर हजर झाला होता तर, एकदा केवळ एक दिवस विलंब केला होता. उच्च न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता त्याला दिलासा दिला. मो. इकबालतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे व अ‍ॅड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title: Mumbai Railway Bomb Blast Prisoner Parole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.