मुकुंदराज स्वामी मराठी माणसाचे गौरव स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:14+5:302021-01-08T04:22:14+5:30
पचखेडी : मराठी भाषेचा आद्यग्रंथ शके १११० (इ.स. ११८८) मध्ये मुकुंदराजस्वामी अंभारो येथे पंचनदीच्या संगमावर लिहिला हे अनेकांना अद्यापही ...

मुकुंदराज स्वामी मराठी माणसाचे गौरव स्थान
पचखेडी : मराठी भाषेचा आद्यग्रंथ शके १११० (इ.स. ११८८) मध्ये मुकुंदराजस्वामी अंभारो येथे पंचनदीच्या संगमावर लिहिला हे अनेकांना अद्यापही माहिती नाही, हे निश्चितच चिंतनीय आहे. मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी आजही संघर्ष करावा लागतो आहे. मुळात मुकुंदराज स्वामी मराठी माणसांचे गौरव स्थान असल्याचे प्रतिपादन कुही नायब तहसीलदार प्रकाश हारगुडे यांनी केले.
श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानाच्या वतीने यंदाही गीताजयंती उत्सावाचे औचित्य साधत मुकुंदराज स्वामी गौरव सोहळा व हरिहरनाथ महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हारगुडे यांनी मुकुंदराज स्वामींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र अंभोरा देवस्थानचे अध्यक्ष रत्नाकर ठवकर होते. संस्थेचे सचिव केशवराव वाडीभस्मे, शामराव खराबे, भास्कर भोंगाडे, प्रा. संजय तिजारे, बाबा तुमसरे याप्रसंगी उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यक्रमात विवेकसिंधूचे पारायण, रात्रीला भजन, पालखी व गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषेला अनेक शतकांचा इतिहास असताना आजही मराठी भाषा कायद्याद्वारे सक्ती करून महाराष्ट्रात शिकावी लागणे, हे मुळात चुकीचे असल्याचे मत प्रास्ताविकात रामेश्वर पेठकर यांनी व्यक्त केले. अंभोऱ्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज प्रा. संजय तिजारे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला देवस्थानचे सहसचिव कमलेश ठवकर, धनराज कुर्जेकार, अरुण चांदेकर, आदी उपस्थित होते. संचालन पत्रकार प्रा. सुरेश नखाते यांनी केले. आभार प्रा.डॉ. अविनाश तितरमारे यांनी मानले.