नगरधन येथे म्युकरमायकाेसिस मार्गदर्शन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:37+5:302021-06-02T04:08:37+5:30
नगरधन : काेराेना संक्रमण काळात काही नागरिकांना म्युकरमायकाेसिस या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या आजाराबाबत माहिती देण्यासाठी ...

नगरधन येथे म्युकरमायकाेसिस मार्गदर्शन सभा
नगरधन : काेराेना संक्रमण काळात काही नागरिकांना म्युकरमायकाेसिस या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या आजाराबाबत माहिती देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी नगरधन (ता. रामटेक) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात उप-जिल्हाधिकारी बढे व तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी या आजाराबाबत विस्तृत माहिती देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.
नगरधन येथे ९० टक्के नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आल्याने हेमा बढे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी काेराेना संक्रमणाची संभाव्य तिसरी लाट, काेराेना रुग्णांना हाेत असलेली म्युकरमायकाेसिसची लागण, या आजाराची लक्षणे, त्यापासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययाेजना व घ्यावयाची काळजी, औषधाेपचार, उपचाराची साेय यांसह अन्य महत्त्वाच्या बाबींची विस्तृत माहिती दिली. बाळासाहेब मस्के यांनी तिसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, शासनाने जाहीर केलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. बाळासाहेब लाड यांनीही मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता काकडे यांनी म्युकरमायकाेसिस या आजाराची शास्त्रीय माहिती समजावून सांगितली. या सभेला सरपंच प्रशांत कामडी, उप-सरपंच अनिल मुटकुरे, ग्रामसेवक सचिन उईके, नितेश सावरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडीसेविका, गावातील सर्व डॉक्टर, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.