शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

एमएसपी केवळ नावालाच ! सीसीआयची ९५% कापूस खरेदी कमी दरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:28 IST

६३ ते ६८ टक्के कापूस व्यापाऱ्यांकडे : सीसीआयचा बाजारातील वाटा ३४ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीसीआयने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एमएसपी दरात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र, मागील वर्षी सीसीआयने खरेदी केलेल्या एकूण कापसापैकी ९५ टक्के कापूस किमान म्हणजेच एमएसपीपेक्षा कमी दरात खरेदी केला. देशातील एकूण कापूस खरेदीत सीसीआयचा वाटा ३२ ते ३७टक्के असून, उर्वरित ६३ ते ६८ टक्के कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

केंद्र सरकारच्या सीएसीपीने सन २०२४-२५ च्या हंगामासाठी लांब धाग्याच्या कापसाची एमएसपी ७,५२१ रुपये तर मध्यम धाग्याच्या कापसाची ७,१२१ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली होती. बहुतांश राज्यांमधील कापूस लांब धाग्याच्या श्रेणीत मोडतो.

या हंगामात यवतमाळ जिल्ह्यात एकूण ८ लाख ७३ हजार ५०७ गाठी पावसाचे उत्पादन झाले होते. सीसीआयने या जिल्ह्यात १५ खरेदी केंद्रावर एकूण १५ लाख ६२ हजार ७७६ क्विंटल म्हणजेच ३ लाख २१ हजार ७४८ गाठी कापूस खरेदी केला. हा संपूर्ण कापूस त्यांनी ७,०२० ते ७,२२० रुपये दराने खरेदी केला आहे. हा दर सीएसीपीने जाहीर केलेल्या एमएसपीपेक्षा १९९ ते ५०१ रुपये कमी आहे.

याच हंगामात देशात ३१२.४० लाख तर महाराष्ट्रात २१ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाल्याचा दावा कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे. याच काळात देशांतर्गत बाजारात ३३२.२५ लाख आणि महाराष्ट्रात ११० लाख गाठी कापूस विक्रीस आला होता. यातील सीसीआयने देशात १००.१६ लाख आणि महाराष्ट्रात २९.४१ लाख गाठी कापूस एमएसपीपेक्षा कमी दराने खरेदी केला आहे.

नोंदणी व खरेदी पद्धती सदोष

सीसीआयला कापूस विकताना शेतकऱ्यांचे नाव सातबारावर नमूद असणे व आधी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करतेवेळी आणि कापूस केंद्रावर विकायला नेल्यावर त्या शेतकऱ्याचे फोटो काढले जायचे. त्या फोटोंची पडताळणी केली जाते. नोंदणी केल्यावर शेतकऱ्याला कापसासोबत खरेदी केंद्रावर जाणे शक्य झाले नाही व घरातील व्यक्ती गेली तर कापूस विकताना अडचणी येतात.

खरेदी केंद्रांची कमतरता

सन २०२४-२५ च्या हंगामात सीसीआयने देशात ५०८ व महाराष्ट्रात १२४ कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी व उमरखेड तालुक्यात एकही खरेदी केंद्र दिले नव्हते. बहुतांश केंद्र तालुक्याच्च्या ठिकाणी दिले होते तर काही तालुके वगळण्यात आले होते. अधिक अंतरामुळे शेतकऱ्यांना त्या केंद्रांवर कापूस नेणे वाहतुकीच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. हीच स्थिती संपूर्ण देशभर होती.

कापूस उत्पादन व सीसीआयची खरेदी

राज्य            उत्पादन           खरेदी (लाख गाठी)तेलंगणा        ४९,००              ४०,००महाराष्ट्र        ११०,००             ३०,००गुजरात         ७७.००             १४.००कर्नाटक       २६,००               ५,००मध्य प्रदेश     १८,५०              ४,००आंध प्रदेश    १३.५००             ४.००ओडिशा        ३.८५               २,००तामिळनाडू    ५,००                ००पंजाब,           २८.००             १.५०हरयाणा,        २८.००             १.५०राजस्थान        २८.००            १.५०

English
हिंदी सारांश
Web Title : MSP in Name Only: CCI's Cotton Purchase at Lower Rates

Web Summary : CCI purchased 95% of cotton below MSP last year, despite government rates. Farmers face challenges with registration, limited purchase centers, and pricing discrepancies. The majority of cotton purchased by CCI was lower than government MSP rates.
टॅग्स :cottonकापूसnagpurनागपूरFarmerशेतकरीfarmingशेती