MSEDCL loses Rs 10 lakh due to storm in rural Nagpur | नागपूर ग्रामीण भागात वादळवाऱ्यामुळे महावितरणचे १० लाखाचे नुकसान

नागपूर ग्रामीण भागात वादळवाऱ्यामुळे महावितरणचे १० लाखाचे नुकसान

ठळक मुद्देअनेक भागात वीजपुरवठा सुरळीत : १५१ विद्युत खांब जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळवाºयासह पावसामुळे नागपूरच्या ग्रामीण भागात महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार १० लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.
वादळवाºयामुळे ग्रामीण भागात महावितरणचे उच्च दाबाचे ४६ आणि लघु दाबाचे १०५ वीज खांब जमीनदोस्त झाले. सोबतच १२ रोहित्र यामुळे नादुरुस्त झाले. वादळवाऱ्याचा सर्वाधिक फटका महावितरणच्या मौदा विभागास बसला. मौदा विभागातील मौदा, रामटेक, कामठी, कन्हान, झुल्लर, वडोदा या गावात विजेचे खांब जमीनदोस्त झाले. १२ पैकी ५ रोहित्र मौदा विभागात नादुरुस्त झाले. उच्च दाबाचे ४६ विद्युत खांब पडल्याने १ लाख १२ हजार व १०५ विजेचे खांब पडल्याने ३ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. उच्च दाबाच्या २.६ किलोमीटर वीजवाहिनीचे ६१ हजार रुपयांचे तर ११ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिनीचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १२ रोहित्र नादुरुस्त झाल्याने १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

काटोल, सावनेरमध्येही बसला फटका
काटोल विभागातील रिधोरा, बाजारगाव, सावरगाव, जलालखेडा, सावनेर विभागातील गोंडखैरी, कळमेश्वर या गावांना बसला होता. येथे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले असून काही ठिकाणी विजेचे खांब उभारणीचे काम सुरू आहे. २ दिवसात येथील वीजपुरवठा सुरळीत होईल.

उमरेड विभागातील ५६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
उमरेड विभागातील डोंगरगाव वीज उपकेंद्र रविवारी रात्री बंद पडले. त्यामुळे ५६०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पण महावितरणकडून रात्रीच या परिसरातील वीजपुरवठा टप्याटप्यात सुरळीत करण्यात आला.

Web Title: MSEDCL loses Rs 10 lakh due to storm in rural Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.