Maharashtra Election 2019; ‘मिसेस सीएम’ उतरल्या प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:13 AM2019-10-14T11:13:04+5:302019-10-14T11:13:38+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या रविवारी प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले.

'Mrs CM' landed in the campaign | Maharashtra Election 2019; ‘मिसेस सीएम’ उतरल्या प्रचारात

Maharashtra Election 2019; ‘मिसेस सीएम’ उतरल्या प्रचारात

Next
ठळक मुद्देअख्खं महाराष्ट्र माझ कुटुंब

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या रविवारी प्रचारासाठी उतरल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग १६, प्रभाग ३७ व प्रभाग ३५ मधून पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. तसेच छत्रपती सभागृह, रवींद्र सभागृह, नरेंद्रनगर येथे उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या, आता मी, पती अन् मुलगी इतकेच माझे कुटुंब मर्यादित राहिलेले नाही. माझे पती देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील जनतेची सेवा करण्याची मोकळीक दिली आहे. आता आमचे कुटुंब मर्यादित राहिलेले नसून अख्खं महाराष्ट्रच कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण-पश्चिम मतदार संघातून पुन्हा सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, भाजपा शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष कीर्तीदा अजमेरा, अनसूया गुप्ता, वंदना शर्मा, नगरसेविका विशाखा मोहोड, सोनाली कडू, जयश्री वाडीभस्मे, पल्लवी श्यामकुळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 'Mrs CM' landed in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.