श्री भगवान नवे वनबल प्रमुख
By Admin | Updated: April 30, 2017 01:46 IST2017-04-30T01:46:55+5:302017-04-30T01:46:55+5:30
राज्य शासनाने वन विभागाचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म्हणून श्री भगवान यांची नियुक्ती केली आहे.

श्री भगवान नवे वनबल प्रमुख
नागपूर : राज्य शासनाने वन विभागाचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म्हणून श्री भगवान यांची नियुक्ती केली आहे. सध्याचे वनबल प्रमुख सर्जन भगत उद्या ३० एप्रिल २०१७ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानुसार श्री भगवान त्यांची जबाबदारी स्वीकारणार आहेत. श्री भगवान भारतीय वन सेवेतील १९८१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) या पदावर कार्यरत आहेत.(प्रतिनिधी)
श्री भगवान हे अत्यंत संयमी, शांत आणि मृदभाषी अधिकारी म्हणून ओळखले जातात.(प्रतिनिधी)