‘श्री बाई समर्थ’ने भरभरून हसवले
By Admin | Updated: November 12, 2016 03:02 IST2016-11-12T03:02:53+5:302016-11-12T03:02:53+5:30
कलारंग नाट्यमहोेत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ‘श्री बाई समर्थ’ हे नाटक सादर झाले.

‘श्री बाई समर्थ’ने भरभरून हसवले
कलारंग नाट्यमहोेत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ‘श्री बाई समर्थ’ हे नाटक सादर झाले. राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित या नाटकाने प्रेक्षकांना अगदी भरभरून हसवले. घरासाठी राबणाऱ्या स्त्रीच्या श्रमांचे वर्र्णन या नाटकात होते. अशा स्त्रीला आदर व प्रेम दिले की झाले. पण, तिच्या या श्रमाबद्दलची कृतज्ञ जाणीव किती कुटुंबात आढळते, असा प्रश्न या नाटकाने हसवता-हसवता प्रेक्षकांसमोर उभा केला. निर्मिती सावंत यांच्यासह, अरुण नलावडे, समीर चौघुले, मनमीत पेम, वनिता खरात यांच्या या नाटकात मुख्य भूमिका होत्या.