कुख्यात आकाशवर एमपीडीएची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:24+5:302021-02-13T04:09:24+5:30

नागपूर : अजनीतील कुख्यात आरोपी आकाश यादवला एमपीडीए अंतर्गत तुरुंगात पाठविण्यात आले आहे. साकेतनगर येथील रहिवासी आकाश विरुद्ध खुनाचा ...

MPDA action on the infamous sky | कुख्यात आकाशवर एमपीडीएची कारवाई

कुख्यात आकाशवर एमपीडीएची कारवाई

नागपूर : अजनीतील कुख्यात आरोपी आकाश यादवला एमपीडीए अंतर्गत तुरुंगात पाठविण्यात आले आहे. साकेतनगर येथील रहिवासी आकाश विरुद्ध खुनाचा प्रयत्न, हप्ता वसुली, मारहाण, धमकी देणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारही करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरात फिरत होता. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आकाशविरुद्ध एमपीडीएची कारवाई केली आहे. त्याला औरंगाबादच्या तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

बाईकस्वाराचा मृत्यू

नागपूर : वाठोडात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे बाईकस्वाराचा मृत्यू झाला. चंदनशेषनगर येथील रहिवासी लक्ष्मण बाबुराव तिवाडे (४०) बुधवारी रात्री बाईकने घरी परतत होते. तरोडी पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या चालकाने त्यांना धडक दिल्यामुळे ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाठोडा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

............

Web Title: MPDA action on the infamous sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.