पानसरेंच्या खुन्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन करणार
By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:46+5:302015-04-09T02:56:46+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या खऱ्या खुन्यांना अटक करून त्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे भाकपचे नेते भालचंद्र कानगो यांनी सांगितले.

पानसरेंच्या खुन्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन करणार
नागपूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या खऱ्या खुन्यांना अटक करून त्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे भाकपचे नेते भालचंद्र कानगो यांनी सांगितले.
पानसरे यांच्या खुन्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी भाकपतर्फे बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. यात कानगो यांच्यासह या मोर्चात श्रमिक मुक्ती दल, भारिप बहुजन महासंघाचे नेते सहभागी झाले होते. पानसरेंचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे आहेत. त्यामुळे त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी संविधान चौकापर्यंतच मोर्चाला परवानगी दिली.तिथे मोर्चाचे रुंपातर जाहीर सभेत झाले.
यावेळी कानगो यांच्यासह मनोहर देशकर, मिलिंद पखाले, अशोक सरस्वती, मनोहर खुळे आणि कॉ.मोहनदास नायडू यांनी विचार मांडले. संचालन श्याम काळे यांनी केले. त्यानंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या हेद्राबाद हाऊस येथील कार्यालयात गेले. येथे त्यांनी आशा पठाण यांना निवेदन दिले.
पानसरेंच्या खुनाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावर आपण समाधानी नाही. जोपर्यंत खरे आरोपी सापडत नाही व त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यत मोर्चे व आंदोलने सुरूच राहतील, असे कानगो म्हणाले. (प्रतिनिधी)