जेनेरिक औषधांची चळवळ आता मनीषनगरातही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:24 AM2018-04-05T00:24:17+5:302018-04-05T00:24:27+5:30

स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनमंचने सुरू केलेली चळवळ आता मनीषनगरातही पोहोचली आहे. या चळवळअंतर्गत शहरातील नवव्या जेनेरिक औषधालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले.

The movement of generic medicines now in Manishnagar | जेनेरिक औषधांची चळवळ आता मनीषनगरातही 

जेनेरिक औषधांची चळवळ आता मनीषनगरातही 

Next
ठळक मुद्देजनमंचचा उपक्रम : शहरातील नववे औषधालय सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जनमंचने सुरू केलेली चळवळ आता मनीषनगरातही पोहोचली आहे. या चळवळअंतर्गत शहरातील नवव्या जेनेरिक औषधालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले.
अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना महागडी औषधे पैशांअभावी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना कमीतकमी पैशात औषधे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने जनमंचने नागपुरात धरमपेठ आणि यादवनगर येथे जेनेरिक औषधांचे दुकान सुरू केले. साधारणत: डॉक्टरांचे तपासणी शुल्क १० ते २० टक्के एवढे असते तर ८० ते ९० टक्के औषधांवर खर्च होतो. जेनेरिक औषधे खरेदी करून हा खर्च कमी करता येतो. जनमंचने सन २०१२ मध्ये ही चळवळ सुरू केली. याअंतर्गत आतापर्यंत लक्ष्मीनगर, मेडिकल चौक, सदर, मानेवाडा, नंदनवन, उमरेड येथे दुकाने सुरू करण्यात आली आहेत. आता मनीषनगरातही ही चळवळ पोहोचली आहे.
ज्येष्ठ नागरिक तसेच बेसा येथील स्वामीधामचे अध्यक्ष दिनकर कडू यांनी फित कापून औषधालयाचे उद्घाटन केले. यावेळी जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, माजी अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, डॉ. पिनाक दंदे, अरविंद पाटील, प्रमोद पांडे, प्रकाश इटनकर, अ‍ॅड. मनोहर रडके प्रामुख्याने उपस्थित होते.
जेनेरिक औषध म्हणजे काय
जेनेरिक औषध म्हणजे औषधांचे केमिकल नाव नसून त्यात असलेल्या घटक पदार्थाचे नाव आहे. उदा. क्रोसिन, अ‍ॅस्प्रिन, डिस्प्रिन या औषधी ब्रॅण्डेड नावाने लिहिल्या जातात. यात मूळ घटक ‘पॅरासिटॉमॉल’ असतो. डॉक्टरांनी हीच औषधे जेनेरिक नावाने लिहून दिली तर त्याची किंमत ४० ते ७० टक्क्यांनी कमी होत असते. अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्रांत जवळपास सगळीच औषधे जेनेरिक नावानेच लिहितात व वापरतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने आपल्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहिण्याचा आग्रह करावा, असे आवाहन जनमंचने केले आहे.
 

Web Title: The movement of generic medicines now in Manishnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.