शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाची चळवळ काळाची गरज : महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 21:59 IST

सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे वृक्षमित्र, जलमित्र ओळखपत्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. वृक्षमित्र आणि जलमित्रांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहील. नागपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.महापालिकेच्या पुढाकाराने वृक्ष आणि जलसंवर्धनाच्या क्षेत्रात व्यापक कार्य व्हावे यासाठी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला प्रतिसाद देत शहरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी वृक्षमित्र आणि जलमित्र बनण्यासाठी महापौर कार्यालयात नोंदणी केली. नोंदणी केलेल्यांना सोमवारी महापौरांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका रूपा राय, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्व्हेनर डॉ. प्रशांत कडू उपस्थित होते.नंदा जिचकार म्हणाल्या, वृक्ष आणि जलसंवर्धनाला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला. वृक्षलागवडीसोबतच वृक्ष जगविण्याचा संकल्प महत्त्वाचा आहे. शहरातील पाणीसाठा वाढविण्यात जलमित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, यासाठी महापालिका आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी उपस्थित वृक्षमित्र आणि जलमित्रांना महापौरांनी ओळखपत्रांचे वाटप केले. महापालिकेच्या माध्यमातून होणाºया विधायक कार्याला शुभेच्छा दिल्या. दिलेल्या संधीचे सोने करू. वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करू, अशी ग्वाही वृक्षमित्र आणि जलमित्रांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण