शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एनआयटी मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध आंदोलन

By admin | Updated: April 26, 2015 02:29 IST

नागपूर सुधार प्रन्यासच्या (नासुप्र) मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध जय जवान-जय किसान संघटना तीव्र आंदोलन करणार

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या (नासुप्र) मेट्रो रिजन आराखड्याविरुद्ध जय जवान-जय किसान संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख प्रशांत पवार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. नासुप्रचा विकास आराखडा जाचक असून शेतकऱ्यांसाठी घातक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांची पायमल्ली करणारा आहे. या आराखड्याविरुद्ध सुमारे ६ हजार ५०० आक्षेप नोंदविण्यात आले आहे. त्यापैकी ४५०० पेक्षा जास्त आक्षेप जय जवान-जय किसानच्या लोकप्रबोधनामुळे झालेले आहेत. विकास आराखडा इंग्रजीत व तांत्रिक स्वरुपाचा असल्यामुळे नागरिकांना समजण्यास कठीण आहे. विकास आराखडा काय, याची लोकांना माहिती नाही. संघटना गावागावात जाऊन प्रत्येक सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना माहिती देऊन जनसुनावणीच्या वेळेस सर्वांना उपस्थित करून या आराखड्याचा एकजुटीने विरोध करणार आहे. पवार म्हणाले, नासुप्र कंपोस्ट डेपोचे आरक्षण रद्द करून ६०० कोटी रुपयांचा मलिदा घशात घालणार आहे. प्रत्येक भूखंडधारकाकडून प्रति चौ.फूट ६० रुपये विकास शुल्क घेणार आहे. यातून नासुप्र ३६० कोटी गोळा करणार आहे. संघटनेने १२२ एकर विकासाचा खर्च काढल्यानंतर प्रत्येक भूखंडधारकाला ५ ते १० हजार रुपये भरावे लागेल. नासुप्रच्या अवाजवी शुल्काला भूखंडधारकांनी विरोध करावा, असे संघटनेचे आवाहन आहे. नासुप्रने वर्धा मार्गावरील शेतजमिनी १५ दिवसांआधीच ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित करून शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डर्सच्या घशात टाकण्याचा नासुप्र डाव आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार संपुष्टात येणार आहे. नासुप्रच्या आजपर्यंतच्या कामाचा लेखाजोखा संघटना मागणार आहे. पत्रपरिषदेत संघटनेचे विजयकुमार शिंदे, रविशंकर मांडवकर, सुभाष बांते, अरुण बनकर, कार्यकर्ते व समस्याग्रस्त भूखंडधारक उपस्थित होते. (प्रतिनिधी)