गवत्या सापाच्या जोडीने पळविले तोंडचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 22:30 IST2020-10-23T22:29:12+5:302020-10-23T22:30:40+5:30
Rare grass snakes found, Nagpur news वाठोड्यानजीक ताजनगर, बिडगाव येथे एका व्यक्तीच्या घरी गवत्या सापाची जोडी आढळून आली. शुक्रवारी सर्पमित्रांनी नरमादीची जोडी पकडून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या सुपूर्द केली.

गवत्या सापाच्या जोडीने पळविले तोंडचे पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोड्यानजीक ताजनगर, बिडगाव येथे एका व्यक्तीच्या घरी गवत्या सापाची जोडी आढळून आली. शुक्रवारी सर्पमित्रांनी नरमादीची जोडी पकडून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या सुपूर्द केली.
सापाची जोडी पाहून लोकांमध्ये भीती पसरली होती. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र ओम चिचघरे, अविनाश हरिणखेडे व जुबेर शेख घटनास्थळी पोहचले. हे गवत्या साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्पमित्रांनी त्यांना सुखरूप पकडून वनविभागाच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये सोडले. त्यानंतर त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.
प्राणिशास्त्राचा विद्यार्थी सौरभ सुखदेवे याने सांगितले, गवत्या साप दुर्मिळ नाही तर विदर्भात सामान्य (कॉमन) पणे आढळणारा साप आहे. त्याला ग्रास स्नेक किंवा वॉटर स्नेक म्हणूनही ओळखले जाते. नावाप्रमाणेच तो गवतात आणि पाण्यात आढळतो. तो हिरव्या रंगाचा असतो व त्यावर ग्रे रंगाचे पट्टे असतात. बेडूक किंवा इतर जलचर प्राणी हे त्याचे खाद्य आहे. हा साप चावतो पण बिनविषारी आहे. या सापाची तरुण मादी ८ ते १२ अंडे देते.