दुकानासमाेरून माेटारसायकल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST2021-06-04T04:08:29+5:302021-06-04T04:08:29+5:30
कन्हान : दुकानासमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल अज्ञात चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत २० हजार रुपये आहे. ही घटना ...

दुकानासमाेरून माेटारसायकल लंपास
कन्हान : दुकानासमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल अज्ञात चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत २० हजार रुपये आहे. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी येथे नुकतीच घडली.
दीपक दर्शन कलवल (३०, रा. सुभाषनगर, घुग्गुस, जिल्हा चंद्रपूर) याने त्याच्या मालकीची एमएच-३४/एजे-५६४२ क्रमांकाची माेटारसायकल टेकाडी (ता. पारशिवनी) येथील एका किराणा दुकानासमाेर उभी ठेवली व कामानिमित्त निघून गेला. दरम्यान, कुणाचेही लक्ष नसताना अज्ञात चाेरट्याने ती माेटारसायकल चाेरून नेली. त्यामुळे त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या माेटारसायकलची किंमत २० हजार रुपये असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. या प्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रामटेके करीत आहेत.