मुलाच्या मानसिक आजाराच्या तणावात आईची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 20:33 IST2022-11-30T20:32:41+5:302022-11-30T20:33:19+5:30
Nagpur News मुलाच्या मानसिक आजाराचा त्रास पाहून त्याच्या आईनेच जीव दिल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

मुलाच्या मानसिक आजाराच्या तणावात आईची आत्महत्या
नागपूर : मुलाच्या मानसिक आजाराचा त्रास पाहून त्याच्या आईनेच जीव दिल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वाठोडा पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना झाली असून पाकुळाबाई सेवकराम राजूरकर (४८, शिवम सोसायटी, वाठोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.
पाकुळाबाई यांना संजय व विजय अशी दोन मुले आहेत. लहान मुलगा विजयला मानसिक आजार असल्याने त्याला खूप त्रास व्हायचा. तो त्रास पाहून त्याच्या आईच्या डोळ्यातून नेहमी पाणी यायचे. त्याच्यावर अनेक उपचार केले. परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही व त्याच्या त्रासामुळे त्या तणावात होत्या. याच तणावातून त्यांनी मंगळवारी घराच्या सिलिंगच्या हूकला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यावर नातेवाइकांनी धावपळ केली. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. संजय राजूरकर याने वाठोडा पोलिस ठाण्यात सूचना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.