नागपूरमध्ये आईला दवाखान्यात नेले, चोरट्यांनी घरच फोडले
By योगेश पांडे | Updated: May 15, 2023 11:52 IST2023-05-15T11:51:29+5:302023-05-15T11:52:01+5:30
बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमधून सोन्याचांदीचे दागिने व रोख ६० हजार असा एकूण ४.६७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.

नागपूरमध्ये आईला दवाखान्यात नेले, चोरट्यांनी घरच फोडले
नागपूर : आईला उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या महिलेचे चोरट्यांनी घर फोडले व साडेचार लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरून नेला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रिती अनंत बोस (३२, साई नगर, मंगलम सोसायटी, नारा) या रात्री साडेसात वाजताच्या सुमारास त्यांच्या आईला घेऊन दवाखान्यात गेल्या होत्या. यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमधून सोन्याचांदीचे दागिने व रोख ६० हजार असा एकूण ४.६७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. घरी परत आल्यावर हा प्रकार लक्षात आला. बोस यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.