शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मायलेकाचा भीषण अपघातात मृत्यू  : पिकअप वाहनाची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:28 IST

भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक - नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील रामटेक-नगरधन मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक) : भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक - नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

राजू नत्थूजी मेहरकुळे (४५) व त्याची आई लीलाबाई नत्थूजी मेहरकुळे (६५) रा दुधाळा (कवडक), ता. रामटेक, अशी मृतांची नावे आहेत. राजू मेहरकुळे हा आपल्या आईसोबत एमएच-४०/एजे-५७२८ क्रमांकाच्या दुचाकीने कार्यक्रमानिमित्त निमखेडा येथे जात होता. दरम्यान रामटेक-नगरधन मार्गावरील शनिमंदिर परिसरात नगरधनकडून येणाऱ्या एमएच-४०/एके-०७३६ क्रमाकांच्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीचे समोरील चाक अक्षरश: तुटून पडले तर दुचाकीच्या समोरील भागाचा चुराडा झाला.अपघातानंतर पिकअप वाहनचालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी पिकअप वाहनाचा पाठलाग करून रामटेक-चिचाळा मार्गावर त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघाताची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.मृत राजू मेहरकुळे हे शेती करायचे. त्यांच्या पश्चात म्हातारे वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा आहेत. मायलेकाच्या अपघाती मृत्यूची वार्ता समजताच दुधाळा गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पिकअप वाहनचालक गोपाल महादेव चौधरी (४२) याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकाटे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू