शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नागपुरात ५० टनांहून अधिक झेंडूची फुले झाली मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:19 PM

ऐन सणाच्या दिवशी नगदी उत्पन्न देणाऱ्या झेंडूच्या फुलांनीच यंदा मात्र शेतकऱ्यांना दगा दिला.

ठळक मुद्देतोडा शेतातच सडला ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर लक्ष्मी रूसली

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘दिवाळीच्या सणात हातात पैसा यावा म्हणून आठ दिवस फुलांचा तोडाच केला नाही. दोन दिवसांआधी फुले तोडून बाजाराला नेणार होतो. पण नेमका तेव्हाच पाऊस आला. लदबदलेले झाड मातीत पडले. चिखलाने फुले भरली. ज्या फुलांचा पैसा होणार होता, त्या फुलांचा शेतात चिखल झाला. आता दोष तरी कुणाला देणाऐन सणाच्या दिवशी नगदी उत्पन्न देणाऱ्या या फुलांनीच यंदा मात्र शेतकऱ्यांना दगा दिला. शेतकऱ्याचा वाली कुणीच नाही बघा’ अशी हृदय पिळवटणारी प्रतिक्रिया आहे सावनेर तालुक्यातील वाकी या गावच्या लक्ष्मीकांत कोढे या शेतकऱ्याची !यंदा ऐन दिवाळीत जिल्ह्यात पाऊस झाला. दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलांची मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ही लागवड केली. ऐन सणाच्या दिवशी नगदी उत्पन्न देणाऱ्या या फुलांनीच यंदा मात्र शेतकऱ्यांना दगा दिला. ऐन दिवाळीत निसर्ग कोपला. फुलांचा पैसा करण्याचे स्वप्न वास्तवात न उतरता डोळ्यातच राहिले अन् आसवांच्या रूपाने अनेकांच्या गालावर ओघळले.नागपूर जिल्ह्यात सुमारे १७०० शेतकरी झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतात. आपल्या शेतापैकी अर्धा एकर ते दोन एकरात या फुलांची लागवड करतात. अडीच महिन्यात ही झाडे फुलावर येतात. दसऱ्यापासून उत्पादन सुरू होते. पुढे दोन महिने झाडावर फुले येत राहतात. दिवाळीत भाव चांगला येत असल्याने आणि मागणीही अधिक असल्याने शेतकरी साधारणत: दिवाळीच्या आठ दिवसांआधी तोडा थांबवितात.लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर तोडा करून माल स्वत:च बाजारात आणतात आणि चिल्लर विक्री करतात. त्यातून नगदी पैसा येत असल्याने शेतकरी कुटूंबांची दिवाळी आनंदाने साजरी होते.यंदा मात्र दगा झाला. एन तोडा करण्याच्या वेळी पाऊस आल्याने झाडे शेताततच पडली. त्यामुळे माल वाया गेला. ज्यांनी तोडा करून आणला होता, त्यांचा माल पावसात सापडल्याने काळा पडला आणि सडला. यामुळे शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाला. सडलेला माल तसाच टाकून शेतकरी उदास मनाने गावाकडे परतले. परिणामत: नागपूरच्या बाजारपेठेत दुसऱ्या दिवशी सडलेल्या फुलांचे ढिग जमा झालेले दिसले.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी संवाद साधला असता अनेकांनी ही सल बोलून दाखविली. नागपूर तालुक्यातील वारंगा येथील राहूल थूल म्हणाले, बाजारात दोन क्विंटल माल आणला होता. अर्धा माल फेकण्यात गेला. ३० ते ४० रुपये किलो भाव आला. वारंगा वाकेश्वर येथील प्रशांत खोंडे म्हणाले, दिवाळीमुळे आठ दिवसांआधी तोडा थांबविला होता. नेमका तो पावसात सापडला.ओला माल विकण्यात न आल्याने ५० ते ६० हजारांचे नुकसान झाले. ऐन कमाईच्या दिवसात फटका बसला.सावनेर तालुक्यातील वाकी येथील लक्ष्मीकांत कोढे यांचा चार क्विंटल माल शेतातच सडला. फुले निवडून ८०० रुपये भाडे देऊन मेटॅडोरने विक्रीला आणली होती. पण पैसा आला नाही. जामघाटचे विनोद रणनवरे मात्र नशिबवान ठरले. पावसाआधीच नऊ क्विंटल फुलांचा तोडा करून त्यांनी विक्रीला आणल्याने ते नुकसानीतून बचावले.

मातीमोल भावनागपूरच्या बाजारपेठेत दिवाळीच्या तीन दिवसात दररोज सरासरी १४ ते १८ क्विंटल झेंडूची फुले विक्रीला आली होती. त्यातील सरासरी २० ते ३० टक्के फुले सडल्याने आणि काळी पडल्याने वाया गेली. अनेकांना शेतातील फुलांचा तोडा करण्याची संधीच मिळाली नाही. पावसात फुलझाडे मोडून चिखलात पडल्याने शेतातील शंभर टक्के माल वाया गेला. असा सरासरी ५० टन माल शेताततच सडला. यंदा हलक्या सुक्या मालाला ४० ते ८० रुपये प्रतिकिलो भाव आला. तर ओल्या मालाला २० ते ३० रुपये प्रति किलो असा भाव आला.

यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. फुले मातीमोल झाली. असे नुकसान टळावे यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदीची सेवा मिळावी, अशी आपण सरकारकडे मागणी करणार आहोत.- जयंत रणनवरे, अध्यक्ष,महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशननुकसान भरपाईची सोयच नाहीबहुतेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर फुलझाडांची नोंद नसल्याने नुकसान भरपाईची सोयच राहिलेली नाही. सात-बारावर नोंद घेण्याचे कष्ट ना तलाठ्याने घेतले; ना शेतकऱ्यांनाही सुचले. त्यामुळे आता नुकसान झाल्यावर केवळ नशिबाला दोष देण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी