शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या जास्त वेगाला ‘आरडीएसओ’ मंजूरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:20 IST

ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी नागपूर मेट्रो आता लवकरच ताशी ९० कि.मी. वेगाने धावायला तयार असेल. पुढे ताशी ९० कि.मी. वेगाने महामेट्रोच्या नागपूर मेट्रोचे ट्रायल रन होणार आहे.

ठळक मुद्देताशी ९० कि़मी. वेगाने ट्रायल रन : तीन सदस्यीय पथकाचा दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी नागपूरमेट्रो आता लवकरच ताशी ९० कि.मी. वेगाने धावायला तयार असेल. पुढे ताशी ९० कि.मी. वेगाने महामेट्रोच्या नागपूर मेट्रोचे ट्रायल रन होणार आहे.ट्रायल रन पूर्वीच्या तयारीचे परीक्षण करण्यासाठी बुधवारी ‘आरडीएसओ’ने (रेल्वे डिझाईन सुरक्षा आॅर्गनायझेशन) नागपूरचा दौरा केला. ताशी ९० किमी वेगाने धावण्याच्या तयारी संबंधीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा होता. उच्चस्तरीय चमूने संपूर्ण दिवस नागपूर मेट्रोचे व इतर संबंधित बाबींचे परीक्षण केले. एच.के. रघू यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांना दिली. चमूत कार्यकारी संचालक (शहरी वाहतूक व उच्च गती) एच.के. रघू, संचालक (बांधकाम) कमलेश कुमार आणि उपसंचालक (यांत्रिक) नमनकुमार यांचा समावेश होता.‘आरडीएसओ’ने प्रथम एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनचे निरीक्षण करून तेथील सुविधांची तपासणी केली. त्यानंतर मिहान मेंटनन्स डेपोसह एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन व खापरी मेट्रो स्टेशनला भेट दिली. न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनचे निरीक्षण करून दोन्ही स्टेशनवरील सुविधांची पाहणी केली. यासह आॅपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) व खापरी येथील स्टेशनचे कंट्रोल रूम तसेच मिहान कार डेपोमधील सोर्इंचा आढावा घेत अपघातग्रस्त परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधित उपायांचे परीक्षण केले आणि इतर यंत्रणांची पाहणी केली. महामेट्रोच्या शंटर, हायड्रॉलिक जॅक आणि इतर बचाव उपकरणांचे निरीक्षण ‘आरडीएसओ’ने केले. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी चमूला प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. प्रकल्पाची प्रगती व इतर सविस्तर माहिती सिव्हिल लाईन्सच्या मेट्रो हाऊसमध्ये देण्यात आली. संपूर्ण दिवस मेट्रो आणि संबंधित बाबींचे परीक्षण झाल्यानंतर ‘आरडीएसओ’ने यावर समाधान व्यक्त केले.यावेळी महामेट्रोचे महाव्यवस्थापक (रोलिंग व स्टॉक) जनक कुमार गर्ग, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ट्रॅक) नरेश गुरबानी, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ट्रॅक्शन) आलोक कुमार सहाय, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिंग्नल) जय सिंग यांच्यासह महामेट्रोचे इतर अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर