शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते  

By सुमेध वाघमार | Updated: February 13, 2024 19:21 IST

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात.

नागपूर: एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे व अति वेगाने वाहन चालविणे या कारणांमुळे प्राणघातक अपघात होतात. कोरोनापेक्षाही जास्त मृत्यु अपघातांमुळे होत आहेत. परिणामी वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे व रस्ता वापरणाºया घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी केले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण) व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यामाने ‘रस्ता सुरक्षा अभियान- २०२४’चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या अभियानाचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, एसटी महामंडळाच्या आगर प्रमुख तांबे, गौतम शेंडे, डॉ. अविनाशचंद्र अग्नीहोत्री, प्रज्ञा मोदी आदी उपस्थित होत्या. संचालन किर्ती खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक भुयार यांनी केले. रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी मांडले. कार्यक्रमाला सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, नितीन सोळंकी, विनोद इंगळे यांच्यासह आरटीओतील अनेक वरीष्ठ अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. किशोर हम्पीहोळी यांच्या मार्गदर्शनात रस्ता अपघातावर पथनाट्य सादर करण्यात आले.

५५ वाहन चालकांना मोतीबिंदूरस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरटीओ व माधव नेत्रालयाच्यावतीने १५ ठिकाणी  ९४०० परिवहन वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ५५ वाहन चालकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. धक्कादायक म्हणजे, तपासणीपूर्वी त्यांना या आजाराची माहितीच नव्हती. गरजू चालकांना चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू