संभाजी भिडे यांच्या समर्थनात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:06 IST2018-03-29T01:06:42+5:302018-03-29T01:06:51+5:30

कोरेगाव भीमा दंगल घडवणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करून संभाजी भिडे यांना समर्थन देण्यासाठी श्री शिवराज्याभिषेकच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नागपूर येथील महाल परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ मोर्चा काढला.

Morcha in support of Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांच्या समर्थनात मोर्चा

संभाजी भिडे यांच्या समर्थनात मोर्चा

ठळक मुद्देकोरेगाव भीमा दंगल प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरेगाव भीमा दंगल घडवणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करून संभाजी भिडे यांना समर्थन देण्यासाठी श्री शिवराज्याभिषेकच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नागपूर येथील महाल परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ मोर्चा काढला.
कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल ही सुनियोजित होती. जातीय तेढ निर्माण करण्याकरिता अशा प्रकारचे कृत्य करण्यात आले. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई सरकाने करावी, अशी मागणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केली.
कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल ही सुनियोजित असल्याचा आरोप आंदोलकांनी यांनी यावेळी केला. तसेच कसल्याही प्रकारची परवानगी नसून तेथे खोट्या इतिहासाचे बॅनर लावण्यात आले. या दंगतील राहुल फटांगडे, जाधव आणि भोंगाडे यांच्यावर हल्ले करणारे कोण आहेत. ते हल्लेखोर अद्याप समोर आले नाहीत. दंगलीमध्ये जो कुणी दोषी असेल, त्याची सत्यता पडताळून सरकारने दोषींना अटक करावी, अशी मागणी युवा चेतना मंचचे अध्यक्ष दिलीप जुटे, दत्ता शिर्कें यांच्यासह कार्यक र्त्यांनी केली.

Web Title: Morcha in support of Sambhaji Bhide