शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

या महिन्यात बघायला मिळेल उल्कावर्षावाचा अभूतपूर्व देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 10:20 AM

अंतराळात घडणाऱ्या घडामोडींपैकी महत्त्वपूर्ण घडामोड या नोव्हेंबर महिन्यात खगोलप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. महिन्याच्या पाच दिवस मध्यरात्रीनंतर पृथ्वीवर उल्कावर्षाव होणार आहे.

ठळक मुद्दे पाच दिवस मध्यरात्री पर्वणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतराळात घडणाऱ्या घडामोडींपैकी महत्त्वपूर्ण घडामोड या नोव्हेंबर महिन्यात खगोलप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. महिन्याच्या पाच दिवस मध्यरात्रीनंतर पृथ्वीवर उल्कावर्षाव होणार आहे. यात दोन दिवस तो अधिक प्रमाणात बघावयास मिळेल. तो पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नसून साध्या डोळ्यानेही तो पाहता येणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.रमण विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या ५ तारखेदरम्यान दरवर्षी दक्षिण टोरिड उल्कावर्षाव होतो, पण सर्वोच्च उल्का ४ व ५ नोव्हेंबरला दिसतात. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हा आकाशातील घटनाक्रम होणार आहे. केंद्राचे अभिमन्यू भेलावे आणि विलास चौधरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘एकने’ या धूमकेतूच्या धुळीमुळे हा उल्कावर्षाव होतो. पृथ्वी जेव्हा या धूमकेतूच्या धुळीतून जाते तेव्हा अवकाशातील धुलीकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने ओढले जातात, मात्र पृथ्वीच्या वातावरणात येताच ते जळतात व त्यामुळे ते आपल्याला पाहता येते. प्रचलित भाषेत त्याला तारे तुटणे असेही बोलले जाते. या महिन्यात होणाºया या घडामोडीनुसार १२ नोव्हेंबरला उत्तर टोरिड उल्कावर्षाव, १६ व १७ नोव्हेंबरला लियोनिड उल्कावर्षाव आणि २२ नोव्हेंबरला मोनोसटाईड उल्कावर्षाव होणार आहे. अधिक उल्कावर्षाव पाहण्याची संधी १२ व १३ नोव्हेंबरला मिळणार आहे व तो टोरस तारासमूहात दिसेल. एकने धूमकेतू तुटून तयार झालेल्या २००४ टीजी-१० या लघु ग्रहाच्या धुळीमुळे उल्कावर्षाव होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टोरस तारासमूहात वृषभ राशीत मध्यरात्रीनंतर फायरबाल उल्कावर्षाव पाहावयास मिळतो.६ ते ३० नोव्हेंबर या काळात लियोनिड उल्कावर्षाव होतो व १६ व १७ नोव्हेंबरला तो अधिक प्रमाणात दिसतो. कारण पृथ्वी जास्त धुलीकण असलेल्या भागातून जाते. मध्यरात्रीनंतर सिंह राशीत तारासमूहात उल्कावर्षाव पाहता येणार आहे. १५ ते २५ नोव्हेंबरदरम्यान मोनोसेटाईड उल्कावर्षाव कर्क राशीजवळ या तारासमूहात दिसणार आहे. सर्वाधिक उल्का २२ नोव्हेंबरला दिसतील. संपूर्ण नोव्हेंबर महिना उल्कावर्षावाचा महिना असल्याने खगोलीय घडामोडीतून ताऱ्यांचा वर्षाव पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींसाठी आहे.उल्का म्हणजे थंड झालेले खडकचअवकाशात झालेल्या प्रचंड स्फोटांमुळे ग्रहांची निर्मिती झाली आहे. यातील आकाराने मोठे असलेले ग्रह व उपग्रह म्हणून ओळखले जातात. त्यापेक्षा लहान आकाराचे असलेले कण ताºयासमान भासतात. या तारकांना विशिष्ट आकार असल्यासारखे जाणवते व या आकारावरून त्या तारासमूहाच्या राशी ठरविल्या जातात. सध्याचा उल्कावर्षाव सिंह व वृषभ राशीमधून होणार आहे. हे कण पृथ्वीच्या कक्षेत आले की गुरुत्व शक्तीने ओढले जातात. मात्र वातावरणात येताच ते जळतात. त्यामुळे ते चमकत पडताना दिसतात. यालाच उल्कावर्षाव म्हणतात.- अभिमन्यू भेलावे, रमण विज्ञान केंद्रही घटना विशिष्ट वेळेत होणारी घटना नाही. ती रॅँडमली होते आणि बहुतेक उल्कावर्षाव मध्यरात्रीनंतरच होतो. शिवाय ते समूहाने होतील असे नाही. एक-दोन किंवा त्यापेक्षा अधिक आणि ते पाहण्यासाठी बराच पेशन्स ठेवावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्याची शक्यता नाही. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी व खगोलप्रेमींसाठी ही महत्त्वाची घटना आहे, त्यामुळे त्यांचे लक्ष राहणारच आहे. मात्र आम्ही रमण केंद्रात येणाºया विद्यार्थ्यांना या घडामोडीबाबत माहिती देत आहोत.- विलास चौधरी, रमण विज्ञान केंद्र.

टॅग्स :Earthपृथ्वी