कोरोनावर ‘मोन्टेलुकास्ट’ ठरणार उपयुक्त; यवतमाळच्या डॉक्टरचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 21:58 IST2022-01-13T21:57:24+5:302022-01-13T21:58:30+5:30
Yawatmal News कोरोना रुग्णांसाठी येथील एका डॉक्टरने केलेल्या संशोधनाची ऑस्ट्रेलियन सरकारने दखल घेतली आहे. औषधातील कोरोना रोखणाऱ्या ‘मोन्टेलुकास्ट’ या गुणधर्माबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारने पेटंट बहाल केला आहे.

कोरोनावर ‘मोन्टेलुकास्ट’ ठरणार उपयुक्त; यवतमाळच्या डॉक्टरचे संशोधन
यवतमाळ : कोरोना रुग्णांसाठी येथील एका डॉक्टरने केलेल्या संशोधनाची ऑस्ट्रेलियन सरकारने दखल घेतली आहे. औषधातील कोरोना रोखणाऱ्या ‘मोन्टेलुकास्ट’ या गुणधर्माबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारने पेटंट बहाल केला आहे.
डाॅ. प्रशांत चक्करवार असे या संशोधकाचे नाव आहे. जगभरात खळबळ माजविणाऱ्या कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिएन्ट आढळून येत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा प्रादूर्भाव होवून भारतातही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार यांनी ‘मोन्टेलुकास्ट’ हे औषध कोविड उपचारात उपयोगी ठरू शकते असे आपल्या संशोधनात सिद्ध केले आहे.
कोविडमुळे होणाऱ्या जीवघेण्या सायटोकाईन स्टॉर्मला हे औषध रोखू शकते. याशिवाय रक्ताच्या गाठी होण्याच्या प्रक्रियेला रोखण्यासाठीही हे औषध उपयुक्त ठरत असल्याचा दावा चक्करवार यांनी केला. ऑस्ट्रेलियन सरकारने त्याची दखल घेत त्यांना ‘इनोव्हेशन पेटंट’ बहाल केले आहे.