शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून वेळेआधी परतणार, थंडी लवकर येणार, परतीचा प्रवास संभ्रमात: पण एक-दाेनदा चांगल्या पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 07:40 IST

Monsoon : पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. त्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास तर सुरू केला नाही ना असा संभ्रम आहे. हवामान विभागाने मात्र यास नकार दिला

- निशांत वानखेडेनागपूर : पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. त्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास तर सुरू केला नाही ना असा संभ्रम आहे. हवामान विभागाने मात्र यास नकार दिला; पण दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू हाेईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत ताे महाराष्ट्रातून निघून जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे ऑक्टाेबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीही सुरू हाेईल, असा अंदाज आहे.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या पाच-सहा वर्षांपासून पर्यावरणाचे चक्र बदलले. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने परतीचा काळही लांबणीवर गेला. गेल्या वर्षी ऑक्टाेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस हाेता आणि शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली हाेती. दरवर्षी साधारणत: १८ ते २० सप्टेंबरदरम्यान परतीचा प्रवास सुरू हाेताे. मात्र, यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले. जूनमध्ये कमतरता असली तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली. 

बदललेल्या हवामान चक्रानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस परतीचा प्रवास सुरू करेल. ज्या वेगाने बरसला, त्या वेगाने निघून जाईल. ३० सप्टेंबरपर्यंत ताे गेलेला असेल. यावर्षी ज्याप्रमाणे उन्हाळ्यात उष्ण लहरी व पावसाने सतावले, त्याप्रमाणे थंडीही सतावेल. हिवाळ्याचा तडाखा तीव्रपणे जाणवेल.     - सुरेश चाेपणे, हवामानतज्ज्ञ

विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेकn विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत एकूण सरासरीपर्यंत पाऊस बरसला आहे. n यामुळे यावर्षी हवामानाचे चक्र बदलले असून, मान्सूनही लवकर परतणार आहे. n राजस्थानमधून देशाच्या वायव्य टाेकापासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू हाेईल आणि ऑक्टाेबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची चाहूल लागेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. n परतीच्या प्रवासादरम्यान विदर्भासह राज्यात एक-दाेनदा पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. n विदर्भात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेईल, तर मुंबई, काेकण, गाेव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान