फोन न उचलणाऱ्या मैत्रिणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 20:21 IST2022-09-29T20:21:01+5:302022-09-29T20:21:35+5:30
Nagpur News फोन न उचलता बोलणे बंद करणाऱ्या मैत्रिणीचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

फोन न उचलणाऱ्या मैत्रिणीचा विनयभंग
नागपूर : फोन न उचलता बोलणे बंद करणाऱ्या मैत्रिणीचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. इम्रान खान (वय ३१, सदर) असे आरोपीचे नाव आहे.
इम्रानची चार महिन्यांअगोदर एका ३१ वर्षीय तरुणीशी मैत्री झाली होती. फोनवर दोघेही बोलत होते व ते एकमेकांना भेटलेदेखील होते. परंतु, इम्रान तिला वेळकाळ न पाहता कधीही फोन करत असे. तिने त्याला असे न करण्यास सांगितल्यावरदेखील त्याने हा प्रकार बंद केला नाही. त्यामुळे तिने त्याचे फोन उचलणे व बोलणे बंद केले. यावरून इम्रान संतापला व तो तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने बुधवारी तिला थांबवत तिचा विनयभंग केला व बरबाद करून टाकण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती देत कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.