महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:37+5:302020-12-26T04:08:37+5:30

बुटीबाेरी : महिलेला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बुटीबाेरी येथे नुकतीच घडली. नंदू वाघमारे, रा. सातगाव असे ...

Molestation of a woman | महिलेचा विनयभंग

महिलेचा विनयभंग

बुटीबाेरी : महिलेला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बुटीबाेरी येथे नुकतीच घडली.

नंदू वाघमारे, रा. सातगाव असे आराेपीचे नाव आहे. त्याचे बुटीबाेरी येथील तरुणीशी प्रेमसंबंध हाेते. त्या तरुणीला पाहायला मुले येत असल्याचे माहिती हाेताच नंदूने तिच्या आईशी वाद घालत भांडण केले. यात त्याने तिला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपीचा शाेध सुरू केला.

....

अल्पवयीन मुलीला पळवून नेले

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेला : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. पळवून नेण्यात आलेली मुलगी ही १६ वर्षाची आहे. या प्रकरणी बेला पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि ३६३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार श्याम मरसकाेल्हे करीत आहेत.

...

अवैध शस्त्र बाळणारा अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : अवैधरीत्या चाकू बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणास पाेलिसांनी अटक केली. ही कारवाई पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेराड राेडवर करण्यात आली.

मनीष दिलीप मुळे (२२, रा. पारशिवनी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. ताे पारशिवनी येथील घाेराड राेडवर हातात चाकू घेऊन दहशत निर्माण करीत हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेत अटक केली व त्याच्याकडून चाकू जप्त केला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Molestation of a woman