शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नागपुरात स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : दारूच्या नशेत धुंद होता ड्रायव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:00 IST

मंगळवारी एका स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडल्या गेलेला चालक दारूच्या नशेत धुंद होता. नशेतच तो स्कूल व्हॅन चालवित होता. यामुळे व्हॅनने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. तसेच स्कूल व्हॅनवर नजर ठेवणाऱ्या शासकीय विभागांचा निष्काळजीपणाही यातून उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी एका स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडल्या गेलेला चालक दारूच्या नशेत धुंद होता. नशेतच तो स्कूल व्हॅन चालवित होता. यामुळे व्हॅनने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. तसेच स्कूल व्हॅनवर नजर ठेवणाऱ्या शासकीय विभागांचा निष्काळजीपणाही यातून उघडकीस आला आहे.मंगळवारी दुपारी इमामवाडा पोलीस ठाण्यासमोर ३० वर्षीय आरोपी आशिष मनोहर वर्मा याला स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. नागरिकांनी आरोपीला चांगला चोप दिला. ऐन वेळेवर पोलिसांनी येऊन त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला. पोलिसांना संशय आहे की, आरोपीने इतर मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केले असावे. त्याला आज न्यायालयासमोर सादर करून न्यायिक तुरुंगात पाठवण्यात आले.आशिष गेल्या ८-९ वर्षांपासून स्कूल व्हॅन चालवित आहे. पीडित मुलगी आणि तिचा पाच वर्षाचा भाऊ त्याच्या व्हॅनमधून शाळेत ये-जा करतात. असे सांगितले जाते की, मंगळवारी सकाळपासूनच आरोपी दारूच्या नशेत धुंद होता. दुपारी ३.३० वाजता व्हॅनमध्ये स्वार इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर पीडित मुलगी व तिच्या भवाला घेऊन तो इमामवाड्यात आला. त्याने इमामवडा ठाण्यजवळील टिंबर मार्केटजवळ व्हॅन उभी केली. त्याने मुलीच्या भवाला ५० रुपये देऊन समोसे व कुरकुरे आणायला सांगितले. तो गेल्यानंतर त्याने मुलीला मागच्या सीटवर नेले आणि तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. दरम्यान रस्त्याने जात असलेल्या एका तरुणीची व्हॅनवर नजर गेली. तिला संशय आल्याने ती व्हॅनजवळ गेली तेव्हा आशिष दिसला. तिने आरडाओरड करून लोकांना बोलावले. तेव्हा आशिषचे कृत्य उघडकीस आले. नागरिकांनी त्याला चांगले झोडपले. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.दारूच्या नशेत धुंद हेता डायव्हरजिवंत जाळण्याचा प्रयत्नआशिषच्या कृत्यामुळे नगारिकांमध्ये इतका प्रचंड रोष होता की, त्यांनी त्याचे केस ओढून त्याला जिवंत जाळण्याची तयारी केली होती. लोकांचे म्हणणे होते की, अशा गुन्हेगारांना जिवंत सोडायलाच नको. नागरिकांचा संताप पाहून पोलिसही हादरले होते. त्यांनी संयमाने काम घेऊन नागरिकांच्या तावडीतून आरोपीला सोडविले.--- तर माहितही पडले नसतेआरोपी आशिष नशेत इतका धुंद होता की, त्याने ज्या ठिकाणी व्हॅन उभी केली होती, तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आणि वर्दळीचा रस्ता असल्याचेही त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळेच तरुणीची त्याच्यावर नजर गेली. हेच कृत्य दुसऱ्या ठिकाणी झाले असते तर कदाचित माहितही पडले नसते.

 

टॅग्स :MolestationविनयभंगStudentविद्यार्थी