शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

विनयभंग : सरपंचाची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 22:46 IST

Molestation , Sarpanch sent to jail रामटेक तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश राऊत यांनी गावातीलच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. १२) रोजी सायंकाळी घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : रामटेक तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश राऊत यांनी गावातीलच एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. १२) रोजी सायंकाळी घडली होती. या घटनेच्या संबंधाने राऊत यांच्यावर विनयभंग व अन्य आरोपावरून गुन्हा दाखल करून रविवारी अटक करण्यात आली होती.सोमवारी कामठी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमक्ष आरोपी राऊत यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयाने राऊत यांना मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की पीडित महिला व सरपंच राऊत काचुरवाही या गावातील रहिवासी आहेत. सरपंच पीडित महिलेच्या घराजवळ गेले व तिच्या पतीला बाहेर बोलावून महिलेबाबत अपशब्द बोलून त्याचा हात मुरगळला. नेमक्या त्याच वेळेस महिला घरातून बाहेर आली व तिने याबाबत जाब विचारला. यावर सरपंचाने अश्लील हातवारे करीत शिवीगाळ केली. यासंदर्भात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंचाविरुद्ध भादंवि कलम ३५४, २९४, ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत अटक केली होती. नियमाप्रमाणे सोमवारी राऊत यांना कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीमा बेंद्रे करीत आहेत.

यापूर्वीसुद्धा सरपंचाने गावातीलच एका महिलेला आधार कार्ड बनवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या त्या महिलेच्या घरच्या लोकांनी सरपंचाला चोप दिला होता. तेव्हाही त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र त्यावेळी राऊत यांनी सक्षम न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला होता.

टॅग्स :MolestationविनयभंगsarpanchसरपंचArrestअटक