बालिकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:07 IST2020-12-07T04:07:09+5:302020-12-07T04:07:09+5:30

बेला : सात वर्षीय बालिकेला मंदिरात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना बेला घडली. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी आराेपीस ...

Molestation of a girl | बालिकेचा विनयभंग

बालिकेचा विनयभंग

बेला : सात वर्षीय बालिकेला मंदिरात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना बेला घडली. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी आराेपीस चाेप देत पाेलिसांच्या स्वाधीन केले.

प्रकाश ऊर्फ काेदू सूर्यभान बावणे (३०, रा. बेला, ता. उमरेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. पीडित बालिका ही त्याच्या घराशेजारी राहते. ती घरासमाेर खेळत असताना प्रकाशने तिला बिस्कीट विकत घेऊन देण्याची बतावणी केली. ताे ओळखीचा असल्याने तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. ताे तिला घेऊन घराजवळ असलेल्या मंदिरात गेला आणि तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. तिने ओरडायला सुरुवात करताच त्याने तिचे ताेंड दाबले. तिचा आवाज ऐकायला येताच परिसरातील तरुणांनी मंदिर गाठले. हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बालिकेला त्याच्या तावडीतून साेडविले आणि चांगला चाेप दिला. एवढेच नव्हे तर त्याला पाेलिसांच्या स्वाधीन केले. पीडित बालिकेच्या आईने तक्रार नाेंदविल्यानंतर बेला पाेलिसांनी भादंवि ३५४ (अ) व पाेक्साे ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदवून त्याल अटक केली.

Web Title: Molestation of a girl