मॉयलची पंतप्रधान केअर फंडात ४५ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 20:05 IST2020-04-04T20:04:59+5:302020-04-04T20:05:32+5:30
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारत सरकारने पीएम केअर फंड हा विशेष फंड तयार केला आहे.आपल्या जबाबदारीनुसार मॉयलने या फंडात ४५ कोटींचे योगदान दिले आहे.

मॉयलची पंतप्रधान केअर फंडात ४५ कोटींची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत असून, भारतातही या महामारीने अनेकांना ग्रासले आहे. हा व्हायरस मानवी जीवनासाठी एक गंभीर आव्हान आहे. अशास्थितीत कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारत सरकारने पीएम केअर फंड हा विशेष फंड तयार केला आहे. या फंडात देशातील नागरिकांसह सर्व कॉपोर्रेटला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यास मदत होणार आहे. आपल्या जबाबदारीनुसार मॉयलने या फंडात ४५ कोटींचे योगदान दिले आहे. याशिवाय मॉयलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार या फंडात दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉयलने सर्व कार्यालय, खाणी, प्रकल्प आणि निवासी टाऊनशिपमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण होणार आहे.