मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 08:29 PM2018-12-13T20:29:41+5:302018-12-13T20:30:25+5:30

नागपुरमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित आघाडीचे अर्थव्यवस्था अधिवेशन घेण्यात आले.

Mohan Bhagwat will be lodged in Nagpur jail; Statements of Prakash Ambedkar | मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

googlenewsNext

नागपूर : काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांना नक्षलग्रस्त भागातील खनिजसंपत्ती लुटायची आहे. म्हणून सलवा जुडुम राबविण्यात आला. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव अडकवले. पुढील निवडणुकीत भाजपला दोन आकडी जागांवर आणणार असून संरसंघचालक मोहन भागवत यांना नागपुरच्याच तुरुंगात टाकण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला. 


नागपुरमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित आघाडीचे अर्थव्यवस्था अधिवेशन घेण्यात आले. यावेळी एमआयएमचे आमदार वारीस पठाण हजर होते. यावेळी आंबेडकर यांनी विविध विषयांवर सरकारवर टीका केली. उर्जित पटेल यांच्या जागी आलेल्या नूतन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे इतिहासाचे पदवीधर आहेत. मग त्यांना आरबीआयचे गव्हर्नर का केले? असे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना संघ आरबीआयला इतिहासजमा करायला निघाला आहे का, असा सवाल उपस्थित केला. 


हेमंत करकरेंना कोणी मारले? पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव अडकवले गेले. या सरकारला पुढील निवडणुकीत दोन आकडी जागांवर आणण्याचे सांगतानाचा भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार असल्याचे वक्तव्य आंबेडकर यांनी केले. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


काँग्रेसला आमच्याशी आघाडी करायची असेल तर एमआयएमसोबतही करावी लागेल. आम्ही एमआयएमची साथ सोडणार नाही. महत्वाचे म्हणजे अशोक चव्हाणांना आधी केंद्रीय नेतृत्वाने आघाडी कोणाशी करावी आणि कोणाशी करू नये याचे अधिकार दिले आहेत का हे आधी स्पष्ट करावे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. 

Web Title: Mohan Bhagwat will be lodged in Nagpur jail; Statements of Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.