शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

आरपीएफची मोहल्ला गस्त, फिरून गोळा केली जात आहे समाजकंटकांची माहिती

By नरेश डोंगरे | Updated: August 26, 2023 18:13 IST

रेल्वेतील गुन्हेगारी नियंत्रित करण्यास मदत

नागपूर : रेल्वेतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि रेल्वेत गुन्हेगारी करणाऱ्या समाजकंटकांना हुडकून काढण्यासाठी रेल्वे लाईनलगत असलेल्या मोहल्ल्यात रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी 'मोहल्ला गस्त' सुरू केली आहे.

रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे लाईनलगत वस्ती (मोहल्ला) असल्यास लोको पायलटकडून रेल्वे गाड्यांची गती कमी केली जाते. ही संधी साधून चोर-भामटे प्रवाशांची बॅग अथवा माैल्यवान चिजवस्तू हिसकावून घेतात आणि लगेच गाडीतून उतरतात. पळतच ते बाजुच्या मोहल्ल्यातून दिसेनासे होतात. अनेक चोरीच्या घटनांमध्ये चोरटे हा सारखा फंडा वापरतात. नंतर ते काही हाती लागत नाहीत.

चोरीची तक्रार दाखल करणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून हा फंडा लक्षात आल्यामुळे अशा सराईत चोर भामट्यांचा छडा लावण्यासाठी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे लाईनजवळच्या वस्तीत जनजागरण सुरू केले आहे. या माध्यमातून जीआरपी आणि आरपीएफ संशयीत तसेच सराईत गुन्हेगारांची माहिती वस्तीतील नागरिकांना देतात आणि संशयीतांची माहिती नागरिकांकडून घेतली जाते. रेल्वेत गुन्हे करून कुणी संशयास्पद अवस्थेत पळताना दिसल्यास जीआरपी किंवा आरपीएफला तातडीने माहिती देण्याचे आवाहनही या माध्यमातून केले जाते.

समाजकंटकांना आवर

अनेकदा काही समाजकंटक कारण नसताना धावत्या ट्रेनवर दगडफेक करतात. त्यात निर्दोष प्रवाशाला जबर दुखापत होते. ज्याला दुखापत झाली त्याला दगडफेक करणाऱ्याची माहिती नसते. मात्र, अशी मानसिकता बाळगणाऱ्यांची त्या मोहल्ल्यातील नागरिकांना माहिती असते. त्यांच्याकडून ती पोलिसांना कळते. काही दिवसांपूर्वी वंदे भारत वर अशीच दगडफेक करणारांची माहिती मिळवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मोहल्ल्यातील नागरिकांचा पोलीस मित्र म्हणून वापर केला जात असल्याने समाजकंटकांना आवर घालण्यास फायदा मिळत असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर