नागपुरात गुढीपाडव्याला मोदी, भागवत एकाच व्यासपीठावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 05:16 IST2025-02-20T05:14:51+5:302025-02-20T05:16:06+5:30
माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा यावेळी होणार आहे. माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाशी संबंधित आहे.

नागपुरात गुढीपाडव्याला मोदी, भागवत एकाच व्यासपीठावर
नागपूर : गुढीपाडव्याच्या दिवशी ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एका व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.
माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा यावेळी होणार आहे. माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाशी संबंधित आहे. माधव नेत्रालयाची नवीन इमारत हिंगणा रोडवरील वासुदेवनगर मेट्रो स्टेशनजवळ ६.८ एकर परिसरात प्रस्तावित आहे. गुढीपाडव्याला सकाळी १० वाजता संस्थेतर्फे नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने या निमंत्रणाला मान्यता दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर नुकत्याच झालेल्या माघी गणेशोत्सवात मुंबई महापालिकेला या आदेशाची अंमलबजावी करताना बरीच कसरत करावी लागली.
हा अनुभव लक्षात घेता आगामी गणेशोत्सवात न्यायालयाच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पालिकेने सार्वजनिक मंडळांना सूचक इशारे देण्याबरोबरच विविध सवलतींचा वर्षाव केला आहे.