२४ तासात मध्यम पावसाचे संकेत : विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:05 PM2019-07-27T23:05:22+5:302019-07-27T23:07:06+5:30

मागील तीन दिवसांपासून मान्सून शहरावर मेहेरबान आहे. शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. कुठे तुरळक तर कुठे जोराच्या सरी नागपुरात बरसल्याने वातावरणातील उकाडा दूर झाला आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरात जोराचा पाऊस आला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात २०.६ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातील अनेक भागातही हलक्या ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे.

Moderate rainfall in 24 hours: rainfall in all districts of Vidarbha | २४ तासात मध्यम पावसाचे संकेत : विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस

२४ तासात मध्यम पावसाचे संकेत : विदर्भातील सर्व जिल्ह्यात पाऊस

Next
ठळक मुद्देपारा घटला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन दिवसांपासून मान्सून शहरावर मेहेरबान आहे. शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. कुठे तुरळक तर कुठे जोराच्या सरी नागपुरात बरसल्याने वातावरणातील उकाडा दूर झाला आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शहरात जोराचा पाऊस आला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात २०.६ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भातील अनेक भागातही हलक्या ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासात नागपूरसह विदर्भातील अनेक भागात मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवस उघाडीनंतर पुन्हा ३१ जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालची खाडी आणि लगतच्या क्षेत्रात चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत हा बदल घडण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशातून पूर्व राजस्थान, झारखंड व ओडिशाच्या लगतच्या क्षेत्रात चक्रीवादळ आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या आकाश ढगांनी व्यापले असून पाऊस पडत आहे.
पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे नागपुरात तापमान सामान्यपेक्षा दोन अंशाने खालावले असून २९ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. सकाळी ८.३० वाजता वातावरणातील आर्द्रता १०० टक्के होती, तर सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ८८ टक्क्यांवर पोहचली.
विदर्भात सर्वदूर पाऊस
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. बुलडाणामध्ये ४३, वर्धा ३५.६, वाशीम २७, अकोला २१, अमरावती १९.९, ब्रह्मपुरी ८.८, गडचिरोली ७.९, गोदिंया ६, यवतमाळ ३.६, चंद्रपूर एक मिमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये तहसील स्तरावर चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
सरासरीच्या ३६ टक्के मागे
जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यापर्यंत मान्सून थंडावलेला दिसत होता. त्यामुळे पावसाचा बॅकलॉग वाढला. प्राप्त आकडेवारीनुसार, विदर्भात सरासरीच्या ३६ टक्के पाऊस कमी पडला आहे. १ जून ते २७ जुलै या काळात विदर्भामध्ये २८१.१ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षाची सरासरी ४३७ मिमी आहे.

Web Title: Moderate rainfall in 24 hours: rainfall in all districts of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.