माेबाईल वापरामुळे मुलांवरील तणाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:23+5:302021-05-30T04:08:23+5:30
आशिष साैदागर कळमेश्वर : काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यांना माेकळ्या वातावरणात मनसाेक्त खेळायला मिळत ...

माेबाईल वापरामुळे मुलांवरील तणाव वाढला
आशिष साैदागर
कळमेश्वर : काेराेना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यांना माेकळ्या वातावरणात मनसाेक्त खेळायला मिळत नाही. शिवाय, ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांचे माेबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बालमनावरील तणाव व त्यांचा चिडचिडपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमाेर निर्माण झाली आहे. याला पालकांसाेबतच बालराेग तज्ज्ञ डाॅक्टरांनी दुजाेरा दिला आहे.
मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. काेराेना संक्रमण कायम कमी न झाल्याने शासनाच्या आदेशान्वये शाळा, महाविद्यालये वर्षभरापासून बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून पालकांसमाेर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठेवण्यात आला. त्यामुळे मुलांनी घरात बसून माेबाईलवर शिक्षण घेतले व परीक्षाही दिली. या काळात काेराेना संक्रमण कमी अधिक हाेत राहिल्याने शालेय मुलांना घराबाहेर खेळायला पाठविणेही दुरापास्त झाले.
मैदानावर माेकळ्या वातावरणात मुक्तपणे खेळणे शक्य नसल्याने, तसेच घरी कुणी समवयस्क खेळायला येत नसल्याने मुले वेळ घालविण्यासाठी बराच काळ टीव्ही बघणे, माेबाईलवर गेम खेळणे व तत्सम बाबी करायला लागले. पालकांसमाेर याशिवाय दुसरा पर्याय नाही. या प्रकारामुळे बालमनावरील तणाव अप्रत्यक्षरीत्या वाढत गेल्याने त्यांची चिडचिड वाढली आहे, अशी माहिती कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रीती इंगळे यांनी दिली.
...
मुलांसाेबत खेळा
बालमनावर दीर्घ काळ असलेल्या या तणावामुळे त्यांच्या शारीरिक आराेग्यावर विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता बळावली आहे. याची चिंता पालकांनाही सतावत आहे. मुलांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी पालकांनी, तसेच घरातील ज्येष्ठांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा. त्यांच्याकडे माेबाईल देऊन दुर्लक्ष करून नये. त्यांच्याशी सतत गप्पा गाेष्टी कराव्या. त्यांच्यासाेबत लहान माेठे खेळ खेळावे. त्यांचा उत्साह कायम टिकून राहील, तसेच त्यांना कंटाळवाणे वाटणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही बालराेग तज्ज्ञांनी दिला आहे.
...
काेराेनामुळे मुलांच्या घराबाहेर पडण्यावर बंधने आली आहेत. त्यांना घरातच राहून टीव्ही, माेबाईलवर वेळ घालवावा लागत आहे. सवंगडी भेटत नसल्याने, तसेच मैदानी खेळ खेळता येत नसल्याने त्यांची मानसिक घुसमट हाेत आहे. याचा मुलांच्या शारीरिक आराेग्यावर परिणाम हाेऊ शकताे. त्यामुळे मुलांची मानसिकता समजून घेत पालकांनी अधिकाधिक वेळ मुलांसाेबत घालवावा.
- डॉ. प्रीती इंगळे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोग तज्ज्ञ
ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर.