लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानक तसेच शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नागपूर रेल्वेच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला एक संशयित आरोपी आढळला. त्याने तपासात नागपूर रेल्वेस्थानक तसेच शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींबाबत माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम बळप, हवालदार दीपक डोर्लीकर, सुरेश राचलवार, श्रीकांत धोटे, राजेश पाली, अरविंद शाह, विनोद खोब्रागडे, अमोल हिंगणे, विजय मसराम, अमित त्रिवेदी, रोशन अली यांनी प्रबुद्धनगर येथे किरायाने राहत असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १९ मोबाईल किंमत २ लाख ४९ हजार ३४७ रुपये ताब्यात घेतले. आरोपी मूळचे झारखंड, बिहार येथील असून, ते मोबाईल चोरीचे काम करतात. त्यांना ५०० रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
नागपूर रेल्वे स्थानकावरून मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:52 IST
रेल्वेस्थानक तसेच शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावरून मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक
ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी