शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अल्पवयीन मुलं-मुली मोबाइलच्या आहारी! पालकांसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 17:34 IST

मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन वाढले आहे. सुरुवातीला मुलगा काय शिकतोय, हे पाहणारे पालक दरम्यानच्या काळात कंटाळून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मुले विविध मनोरंजनाच्या मोहात अकडले आहेत.

ठळक मुद्देघर सोडून जाणे, नको त्या वयात नको ते पाहण्याचे वाढले प्रकार

नागपूर : एकीकडे स्मार्टफोनमुळे नातेसंबंध बिघडत चालले आहेत, तर दुसरीकडे अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात मोबाइल आल्याने त्याचे दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत. छोट्या-छोट्या कारणावरून घर सोडून जाणे? नको त्या वयात नको ते पाहणे? आमिषाला बळी पडणे? अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकूणच बघता-बघता हसत्या खेळत्या घरावर दु:खांचा डोंगर कोसळत आहे.

कोविड आपत्तीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षापासून ऑनलाइन एज्युकेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेज मोबाइल, टॅब व लॅपटॉपवर सुरू आहेत. याचा परिणाम आता दिसून येत आहे. मुलांमध्ये ‘मोबाइल ॲडिक्शन’चे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्रामीणमध्ये शाळा सुरू झाल्या असताना व शहरात ४ ऑक्टोबरपासून ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार होणार असले तरी अनेकांच्या हातून मोबाइल सुटलेला नसल्याचे वास्तव आहे.

मोबाइलचे दुष्परिणाम

लहान मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन वाढले आहे. सुरुवातीला मुलगा काय शिकतोय, हे पाहणारे पालक दरम्यानच्या काळात कंटाळून त्याकडे दुर्लक्ष केल्याने मुले विविध मनोरंजनाच्या मोहात अकडले आहेत. मोबाइल गेम्स, यू-ट्यूब, चॅटिंग व चित्रपट पाहण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या निर्बंध शिथिल असले तरी कोणी बाहेर खेळण्यास जात नाही. शाळेच्या वेळापेक्षा जास्त वेळ मुले मोबाइल पाहत आहेत. यासाठी खोटे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहत असल्याने उशिरा झोपणे व उशिरा उठण्याचे प्रकार घराघरात सुरू आहेत. अभ्यासाची आवड कमी झाली असून त्याचा दर्जाही घसरला आहे.

ही घ्या काळजी

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, लहान मुलांमध्ये मोबाइल ॲडिक्शनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एकदम त्याच्या हातून मोबाइल हिसकावू नका. मोबाइल पाहण्याचा वेळ हळूहळू कमी करा. मोबाइलमधून चित्रकला, हस्तकला किंवा एखादे वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करा. त्याचा ‘फालोअप’ घ्या.

मोबाईलच्या अ‍ॅडीक्शनचे दुष्परिणाम

८ व्या वर्गात शिकणारी शुभाला (नाव बदलेले आहे) ‘यू-ट्यूब’ पाहण्याचे वेड लागले. ऑनलाइन वर्ग सुरू असतानाही ती ‘यू-ट्यूब’ पाहत होती. तिचे इतरांशी बोलणे कमी झाले होते. आपल्यातच गुंतून राहत होती. पालकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यातून भांडण झाले. ती घर सोडून जाण्याच्या तयारीत होती; परंतु पालकांनी त्वरित मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेतला. त्यांच्या समुपदेशनामुळे ती बरी झाली. 

असेच आणखी एक उदाहरण आहे सिद्धूचे, ७ व्या वर्गात असलेल्या सिद्धूला मोबाइल गेम्स खेळण्याची सवय लागली. त्याला ही सवय त्याच्या मोठ्या भावामुळे लागली. सिद्धू अभ्यासाच्या नावावर गेम्स खेळत राहायचा. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत त्याचे गेम सुरू राहायचे. ऑनलाइन गेममुळे तो आमिषाला बळी पडला. आत्महत्येचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. हा प्रकार पालकांचा लक्षात येताच त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली.

शाळा सुरू झाल्याने मोबाइलचे व्यसन सुटेल

मुलांना एखाद्या गोष्टीचे ॲडिक्शन झाले तरी योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याने ते त्यातून बाहेरही लवकर पडतात. आपल्याकडे पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहेत. यामुळे मुले पुन्हा मित्रांमध्ये मिसळतील, खेळतील, अभ्यासाला लागतील. यात त्यांना पालकांच्या मदतीची गरज असणार आहे. मुलांशी संवाद वाढविणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख मनोविकृतीशास्त्र विभाग, मेयो

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानHealthआरोग्य