राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ; चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआ सरकारवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 18:31 IST2022-04-11T18:30:43+5:302022-04-11T18:31:16+5:30
महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ असून महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका जनतेला बसणार असल्याचे आमदार चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ; चंद्रशेखर बावनकुळेंचा मविआ सरकारवर निशाणा
नागपूर : महाविकास आघाडी सरकारने तब्बल १३ टक्के वीज दरवाढ सर्वसामान्यांवर लादली असल्याची खंत राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) यांनी व्यक्त केली आहे. ही दरवाढ राज्याच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दरवाढ असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ असून महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका जनतेला बसणार असल्याचे आमदार चन्द्रशेखर बावनकुळे यांचे म्हणणे आहे. येत्या काळात ही दरवाढ पुन्हा वाढू शकते असेही ते म्हणाले.
राज्य सरकार आणि वीज कंपन्यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे हे झाले आहे. यासाठी आपण राज्य सरकारचा निषेध नोंदवत असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारने ही १३ टक्के दरवाढ सामान्य जनतेवर लादू नये, अशीही टीका त्यांनी केली.