शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'मला विश्वास आहे अमोल कोल्हेंना बोलायला लावलं असेल'; अजित पवार गटातील आमदाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:29 IST

काल पनवेल येथे राष्ट्रवादीतील खासदार शरद पवार गटाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

नागपूर- काल पनवेल येथे राष्ट्रवादीतील खासदार शरद पवार गटाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. "शरद पवारांनी काय केलं असा जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या वेळेला समोर प्रश्न विचारण्याच्या आधी कानाखाली जाळ काढावासा वाटतो", अशी टीका खासदार कोल्हे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली, यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

"कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे की..."; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा

"अजित दादांनी कोल्हे साहेबांना शिरुरमध्ये किती मदत केली हे त्यांना माहिती आहे. ते जर बोलले असतील तर मी त्यांच्यासाठी अजितदादांनी काय काय केलं आहे याची माहिती देतो. खासदार अमोल कोल्हे यांना त्यांनी बोलायला लावले असेल, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला. पवार साहेब यांचं आता जास्त वय झाले आहे म्हणून दादांनी त्यांना सल्ला दिला असेल. पण, साहेबांना कायम माणसात राहण्याची सवय आहे, त्यामुळे ते एकटे राहू शकत नाही. ते त्यांच्या जीवनाचे वेगळेपण आहे. साहेबांना बोलण्याचा अधिकार आहे ते मोठे आहेत, असंही आमदार मिटकरी म्हणाले.   

काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शरद पवार यांनी काय केलं, असा प्रश्न काही जणांकडून विचारला जातो. मात्र असा प्रश्न विचारणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे, पवारसाहेबांनी काय नाही केलं? ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो," अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचा समाचार घेतला.

अजित पवार गटावर निशाणा साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, "आपल्यातून गेलेले नेते दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे आहेत. वतनदारी वाचवण्यासाठी त्या वेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते. महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला. दिल्लीश्वरांना प्रश्न विचारायचा स्वाभिमान यांच्यात राहिला नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारायचं बंद होतं, तेव्हा अंधभक्त तयार होतात. पक्ष फोडून  चाणक्य होता येत  नाही तर स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा करणारेच खरे चाणक्य आहेत," असा टोलाही कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे