भाजपातर्फे ईव्हीएम मशीनचा गैरवापर

By admin | Published: February 25, 2017 02:15 AM2017-02-25T02:15:07+5:302017-02-25T02:15:07+5:30

नुकत्याच पार पडलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीनचा गैरवापर करीत

Misuse of EVM machine by BJP | भाजपातर्फे ईव्हीएम मशीनचा गैरवापर

भाजपातर्फे ईव्हीएम मशीनचा गैरवापर

Next

प्रकाश गजभिये यांचा आरोप : सर्वोच्च न्यायालयात करणार तक्रार
नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीनचा गैरवापर करीत घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. या घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयात तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नोटाबंदी , महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, भाजीपाला, घरगुती सामानांची दरवाढ, सिलेंडरची दरवाढ आदी दैनंदिन वस्तूंची दरवाढ भाजपने केली असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यांनी आपले मतदान महागाई बेरोजगाराविरोधात केले आहे.
आपण हरणार या भीतीपोटी भाजपने साम, दाम, दंड, भेद, नीतीचा उपयोग करून आपले उमेदवार गैरमार्गाने निवडून आणले. यासाठी त्यांनी इव्हीएम मशीन मध्ये भ्रष्टाचार केला, असा आरोप त्यांनी केला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Misuse of EVM machine by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.