नद्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष फंड स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सांगितले की, नाग नदी, पिवळी नदी व पोरा नदीची स्वच्छता करण्यासाठी विशेष फंड देण्याची योजना आखण्यात आली आहे. या फंड अंतर्गत एक कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते. हा निधी वर्षभरात खर्च केला जाईल. गटारीचे पाणी थेट नदीपात्रात नागनदीप्रमाणेच पिवळ्या नदीतही गटारीचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे आढळून आले आहे. काही फ्लॅटस्कीमने मोठमोठी गटारे नदीला जोडली आहे. यामुळे नदीतील पाणी मोठय़ा प्रमाणात दूषित होत आहे. या गटारी बंद करण्याची गरज पाहणी दौर्यात व्यक्त करण्यात आली. गोरेवाडाच्या ओव्हरफ्लोवर छठ पूजामहापौर सोले यांनी सांगितले की, गोरेवाडा ओव्हरफ्लो मधून निघालेले स्वच्छ पाणी पिवळी नदीत जाऊन मिळते. या ठिकाणी गेल्यावर्षी गणपती विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी फ्लो जवळ छठपूजेची व्यवस्था केली जाईल. परिसरातील नागरिक शनिवारी o्रमदानाच्या माध्यमातून मोहिमेस मदत करतील. अतिक्रमणामुळे प्रवाहात अडथळा महापालिका आयुक्त वर्धने यांनी सांगितले की, पिवळी नदीजवळ माती, गाळ, मोठय़ा प्रमाणात साचला आहे. त्यामुळे प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. सोबतच काही लोकांनी नदीपात्रात अतिक्रमण केल्याचेही दिसून आले आहे. या अतिक्रमणांमुळेही प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. पिवळी नदी सफाई अभियानाचा आढावा घेताना महापौर अनिल सोले, आयुक्त श्याम वर्धने. गेल्या नऊ दिवसात १८ किमी पैकी १३ किमीचा पट्टा स्वच्छ केल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. महापौर अनिल सोले, आयुक्त श्याम वर्धने, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर आदींनी शुक्रवारी पिवळी नदी स्वच्छता अभियानाची पाहणी केली. शुक्रवारी दुपारी महापौर सोले पदाधिकार्यांसह गोरेवाडा तलावाशेजारी पिवळी नदीच्या उगम स्थानावर मोहिमेचा आढावा घेण्यासाठी पोहचले. गोरेवाडा तलावातून सतत पाणी नदीत येत आहे. या भागातील नदीपात्र पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले आहे. गोरेवाडा घाटावर माती व गाळामुळे नदीचा प्रवाह रखडला आहे. येथे एक पोकलँड लावून गाळ काढण्याचे काम जोरात सुरू आहे. नारा घाटाजवळ नदीचे पात्र बर्यापैकी स्वच्छ झाले आहे. कळमना गाव पोलीस चौकीजवळ नदीपात्रातून माती व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नागपूर : नागनदी स्वच्छता अभियानानंतर आता महापालिकेने पिवळी नदी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. १ मे पासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत नदीतील बराचसा गाळ, कचरा बाहेर काढण्यात आला असून प्रवाह सुरळीत करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी बर्याच वर्षांपासून नदीपात्रात जमलेला गाळ व माती बाहेर काढणे जरा कठीणच दिसत आहे. पिवळी नदी स्वच्छतेनंतर नदीच्या पात्रात असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीमही हाती घेतली जाईल, असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. सफाई दरम्यान नदीपात्रात जेथे अतिक्रमण दिसत आहे त्यांना आताच नोटीस बजावली जात आहे. झोन स्तरावर हे काम सुरू आहे.
मिशन पिवळी नदी
By admin | Updated: May 10, 2014 01:14 IST