यशोधरानगरातील मुली बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:04+5:302020-11-28T04:09:04+5:30
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ आणि १७ वर्षे वयाच्या दोन मुली गुरुवारी दुपारी ४ वाजता ...

यशोधरानगरातील मुली बेपत्ता
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ आणि १७ वर्षे वयाच्या दोन मुली गुरुवारी दुपारी ४ वाजता घरून निघून गेल्या. रात्रीपर्यंत शोधाशोध करूनही त्या कुठेच आढळल्या नाही. त्यामुळे पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. या दोघींना फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून बेपत्ता मुलींचा शोध घेतला जात आहे.
---