शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ?

By admin | Updated: June 12, 2014 01:18 IST

संग्राम बारमधील खूनप्रकरणी अद्याप कोणताही आरोपी पोलिसांना गवसलेला नाही. या बारमधील सीसीटीव्हीला संलग्न असलेल्या रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ करण्यात आल्याने, आरोपींना हुडकून काढणे

संग्राम बार खून प्रकरण : आरोपी बेपत्ताच
नागपूर : संग्राम बारमधील खूनप्रकरणी अद्याप कोणताही आरोपी पोलिसांना गवसलेला नाही. या बारमधील सीसीटीव्हीला संलग्न असलेल्या रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ करण्यात आल्याने, आरोपींना हुडकून काढणे पोलिसांना मुश्किल होत आहे. १० जूनच्या रात्री १.४५ वाजताच्या सुमारास गाण्याची फर्माईश केल्यावरून पाच-सहा अनोळखी व्यक्तींनी सीताबर्डी येथील सुमित सुरेश तिवारी या तरुणाचा खून करून मोहम्मद रियाज हक याला गंभीररीत्या जखमी केले होते. गैरप्रकार रोखण्यासाठी या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हाणामारी आणि खुनाची घटना घडताच भाड्याने आॅर्केस्ट्रा फ्लोअर चालविणारा राजू आणि बारचा व्यवस्थापक किशोर यांनी कॅमेऱ्याला संलग्न रेकॉर्डिंग बॉक्स गहाळ केला. वस्तुत: या कॅमेऱ्यात चार बालांचा डान्स, सुरू असलेला धिंगाणा, हाणामारी आणि खुनीहल्ल्याचे चित्रीकरण झाले होते. बॉक्स पोलिसांच्या हाती लागून आपले बिंग फुटेल म्हणून या दोघांनी बारबाला आणि रेकॉर्डिंग बॉक्स गहाळ केला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर पोलिसांनी रेकॉर्डिंग बॉक्सबाबत चौकशी केली असता, राजू आणि किशोर यांनी चक्क आपणाला काहीही माहीत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना बाजीराव दाखवताच त्यांनी बॉक्स आणून दिला. परंतु या बॉक्समधील संपूर्ण डाटा गहाळ करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. बारबालांचा पुरवठा करणारा राजू याने सध्या शहरातील तीन बारमधील आॅर्केस्ट्रा फ्लोअर भाड्याने घेतलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा कमावण्याच्या लालसेने आॅर्केस्ट्राच्या आड तो डान्स फ्लोअरही चालवायचा. राजू याला यापूर्वी बंगलोर, मुंबई, सोनेगाव, सीताबर्डी, प्रतापनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. आॅर्केस्ट्रा फ्लोअर भाड्याने देणे हा परवान्यातील अटींचा भंग आहे. (प्रतिनिधी)