नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 02:20 PM2020-02-14T14:20:49+5:302020-02-14T14:22:42+5:30

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली.

Misbehavior of anti social elements in Yashodharanagar, Nagpur | नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस

नागपुरातील यशोधरानगरात समाजकंटकांचा हैदोस

Next
ठळक मुद्देवाहनांची तोडफोड, गोंधळपरिसरात प्रचंड दहशत, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजकंटकांनी गुरुवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. आरडाओरड आणि शिवीगाळ करीत त्यांनी वाहनांची तोडफोड केली. हे पाच ते सात गुंड तब्बल अर्धा तास दहशत पसरवत असल्याने नागरिक कमालीचे भयभीत झाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कमाल चौक परिसरात गुन्हेगारांच्या दोन गटाचा आधी वाद झाला. एकाची कार अडवून दुस-या गटाने मारहाण केल्यानंतर मारहाणीचा बदला घेण्यासाठी पाच ते सात गुंड यशोधरानगर परिसरात पोहचले. त्यांनी पंचवटीनगर, इंदिरानगर, धम्मदीपनगर, गुरुवारी बाजार परिसरात प्रचंड आरडाओरड आणि शिवीगाळ करीत ३० ते ४० गाड्यांची तोडफोड केली. गुंडांचे हे टोळके दारूच्या नशेत टून्न होते. त्यांचा अविर्भाव पाहून परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आले. हिम्मत करून काहींनी आरडाओरड केली. तर काहींनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांचा ताफा तिकडे धावला. दरम्यान, आरोपी पळून गेल्यानंतर या भागातील नागरिक एकत्र झाले. तोवर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येत यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात पोहचले. त्यांनी नागरिकांची कशीबशी समजूत काढून त्यांना परत पाठविले. पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींची शोधाशोध केली. शुक्रवारी दुपारपर्यंत चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची ‘चौकशी’ सुरू होती.

 

Web Title: Misbehavior of anti social elements in Yashodharanagar, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.