शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रक्रियेचा चमत्कार : एका विद्यार्थ्याची एकाच शाळेत तीन वेळा निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 21:38 IST

Miracle of RTE process आरटीईत प्रवेश हा नशिबाचाच खेळ आहे. ६ हजार जागांसाठी २५ ते ३० हजार बालकांचे पालक अर्ज करतात. त्यामुळे हजारो बालके प्रवेशापासून वंचित राहतात. अशात एका बालकाची एकाच शाळेत तीन वेळा निवड झाली असेल तर विद्यार्थ्याचे नशीब म्हणावे की आरटीई प्रक्रियेचा चमत्कार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपालकाची बोगसगिरी नडली, प्रवेश रद्द होण्याची वेळ

लोकमत  न्यूज नेटवर्क

नागपूर : आरटीईत प्रवेश हा नशिबाचाच खेळ आहे. ६ हजार जागांसाठी २५ ते ३० हजार बालकांचे पालक अर्ज करतात. त्यामुळे हजारो बालके प्रवेशापासून वंचित राहतात. अशात एका बालकाची एकाच शाळेत तीन वेळा निवड झाली असेल तर विद्यार्थ्याचे नशीब म्हणावे की आरटीई प्रक्रियेचा चमत्कार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा प्रकार काटोल तालुक्यातील एका बालकाच्या बाबतीत घडला आहे. तीन वेळा निवड होऊनही पालकाने अर्ज करतानाच केलेल्या बोगसगिरीमुळे त्या बालकाचा प्रवेश रद्द होण्याची वेळ आली आहे. काटोल तालुक्यातील अरविंद इंडो पब्लिक स्कूलशी निगडित असलेला हा प्रकार आहे. या बालकाच्या पालकाने आरटीईत अर्ज भरताना बालकाच्या नावाचे, स्वत:च्या नावाचे व आडनावाचे तीन वेगवेगळे स्पेलिंग लिहिले. परंतु आईच्या नावाचे स्पेलिंग तीनही अर्जात एकच टाकले. शिवाय एकाच शाळेची निवड केली. आरटीईच्या निवड यादीत या बालकाच्या तीनही वेगवेगळ्या नावाची निवड एकाच शाळेत झाली. तालुक्यातील कागदपत्र पडताळणी समितीने कागदपत्राची तपासणी केल्यानंतर शाळेने एका नावाचा प्रवेशही करून घेतला.

ही बाब आरटीई अ‍ॅक्शन कमिटीच्या निदर्शनास आली. कमिटीच्या सदस्यांनी अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये निवड झालेल्या बालकांची यादी बघितली असता, त्यांना हा बोगसपणा निदर्शनास आला. याच शाळेतील पुन्हा एक बालक आहे, ज्याचीसुद्धा याच शाळेत दोन वेळा निवड झाली. त्यालाही शाळेत प्रवेश मिळाला.

 या प्रकरणात पालकाने बोगसगिरी केली. तालुक्याच्या कागदपत्रे तपासणी समितीने दुर्लक्ष केले. शाळेचाही यात सहभाग आहे. अशा बोगसगिरीमुळे अनेक बालके प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी.

मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर